Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला..! आज ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरणार, वाचा सविस्तर

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उसंत घेतली आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.

मात्र आता राज्यात मौसमी पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होत असून पुढील तीन दिवस भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, तुरळक ठिकाणी अधूनमधून बरसणाऱ्या सऱ्या आता तीव्र होणार आहेत, म्हणजेच पावसाचा जोर येत्या काही दिवसात अजूनच वाढणार आहे.

यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यात पुण्यासह एकूण 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला असून राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका वाढला आहे. दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमावलेल्या पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता प्रसिद्ध झाला आहे.

पंजाब रावांनी (Panjabrao Dakh) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत. राज्यातील काही भागात मोठा पाऊस देखील या दरम्यान कोसळणार आहे.

मात्र राज्यात कोसळणारा हा पाऊस सर्वदूर नसणार असा अंदाज पंजाब रावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवला आहे. आज आणि उद्या राज्यातील वाशिम अहमदनगर बुलढाणा लातूर नांदेड उस्मानाबाद सातारा सांगली कोल्हापूर पुणे बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मोठा पाऊस कोसळणार आहे.

28 तारखे नंतर पावसाचा जोर ओसरणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले. मात्र असे असले तरी राज्यातील काशी जिल्ह्यात 28 तारखेनंतर देखील पाऊस कोसळणार आहे. 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार आहे. या दरम्यान राज्यातील उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

निश्चितच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), विदर्भातील तसेच कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला असेल. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे कोकणातील तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील व विदर्भातील शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. खरीप हंगामातील अनेक पिके पावसाच्या पाण्याखाली गेली आहेत.

विदर्भात परिस्थिती खूप बिकट बनली आहे, विदर्भातील शेतकऱ्यांना मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस नव्हता म्हणून दुबार पेरणी करावी करावी लागली होती आता गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पेरणी केलेली पिके देखील पाण्याखाली गेली होती. आता पावसाचा जोर ओसरला असल्याने शेतकरी बांधवांना हंगामातील पिकांच्या वाढीसाठी उपाययोजना करता येणार आहेत. शेतकरी बांधवांना आता शेतीची कामे करण्यासाठी उघडीप मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव बघायला मिळत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe