Onion Farming: कांदा (Onion) ही एक महत्त्वाची भाजी आहे. हे भाज्या आणि मसाल्यांसाठी कच्चे आणि शिजवलेले कंद म्हणून वापरले जाते. कांद्याची लागवड (Onion Cultivation) संपूर्ण भारतात केली जाते. याची शेती (Farming) आपल्या राज्यात देखील विशेष उल्लेखनीय आहे.
आपल्या राज्यात कांद्याची लागवड तिन्ही हंगामात केली जाते. राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामात (Kharif Season) लाल कांद्याची, रब्बी हंगामात रांगड्या कांद्याची तर उन्हाळी हंगामात उन्हाळी कांद्याची लागवड करत असतात.

राज्यातील शेतकरी बांधव प्रामुख्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड करत असतात, मात्र असे असले तरी याची खरिपातही मोठ्या प्रमाणात शेती बघायला मिळते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण हे कांदा या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते. अशा परिस्थितीत आज आपण कांद्याच्या काही सुधारित जाती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कांद्याच्या काही प्रगत जाती:- शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसातखरीप हंगामातील कांदा लागवड सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कांद्याच्या खरीप हंगामात लागवड करता येणाऱ्या काही प्रगत जातींची माहिती घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो खरीप हंगामात लागवड करता येणाऱ्या कांद्याच्या जाती जाणून घेऊया.
खरिपातील कांद्याचे प्रगत वाण
Agrifound Dark Red- कांद्याची ही खरीप हंगामातील एक प्रमुख जात आहे. या जातीची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कृषी तज्ञांच्या मते, कांद्याची ही जात लावणीनंतर 91 ते 110 दिवसांत परिपक्व होते. म्हणजेच मोजून तीन महिन्यात कांद्याची ही जात उत्पादन देण्यास तयार होते. कांद्याच्या या जातींचे सरासरी उत्पादन हेक्टरी 300 क्विंटलपर्यंत असल्याचा दावा केला जातो.
N-53 – ही देखील कांद्याची एक प्रगत जात आहे. या जातीची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, ही जात लावणीनंतर 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होते. कांद्याच्या या जातीचे उत्पादन हेक्टरी 250 क्विंटल असल्याचा दावा केला जातो. निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही जात फायदेशीर ठरणारी आहे.
अर्का निकेतन- ही देखील कांद्याची एक सुधारित जात आहे. या जातीची लागवड देखील खरीप हंगामात केली जाते. ही इतर जातींच्या तुलनेत अधिक उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.
कृषी तज्ञांच्या मते, ही जात 120 ते 125 दिवसांनी ही जात काढणीसाठी तयार होत असते. म्हणजेच लागवड केल्यानंतर चार महिन्यांनी या जातीपासून उत्पादन मिळते. कांद्याच्या या सुधारित जातीपासून हेक्टरी 350 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
अर्का कल्याण- कांद्याच्या सुधारित जाती मध्ये या जातीचा देखील समावेश आहे. ही जात मुख्यता खरीप हंगामात लावली जाते. खरीप हंगामात लावता येणाऱ्या या जातीचे उत्पादन देखील विशेष उल्लेखनीय आहे.
ही एक उच्च उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, या जातींचे रोप लावल्यानंतर 110 ते 115 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. कांद्याची ही प्रगत जात हेक्टरी 325 क्विंटल उत्पादन देत असल्याचा दावा केला जातो.