Panjabrao Dakh : भारतीय हवामान विभागाने काल पावसाचा (Rain) जोर कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र काल राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस (Monsoon) झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस (Monsoon News) झाला असल्याने शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे.
फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात परतीचा पाऊस (Monsoon Rain) धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे. नाशिक प्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. याशिवाय अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही पावसाची जोरदार बॅटिंग झाली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या चार विभागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मध्ये कोल्हापूर सहित आज एकूण नऊ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात तसेच राजधानी मुंबई पुणे सातारा ठाणे यां जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. निश्चितच परतीचा पाऊस अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख यांच्या मते 19 तारखेपासून म्हणजे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे. आज मात्र राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एकंदरीत उद्याचा दिवस पावसाचा राहणार आहे.
19 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी दिली आहे. याशिवाय 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या द्राक्ष पट्ट्यात पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी नमूद केले आहे. निश्चितच राज्यात अजूनही पावसाने पूर्णविराम घेतलेला नाही.
यामुळे खरीप हंगामातील काढणीयोग्य पिकांची आणि काढणी झालेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू आहे तर काही ठिकाणी सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात आहे अशा पिकावर आता सोयाबीन अंकुरायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे बाजारात सोयाबीनला नगण्य बाजारभाव मिळत आहे. अशा परिस्थितीत सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला असल्याचे चित्र आहे.