Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच कोसळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात परतीच्या पावसाची (Monsoon) हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागत आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे आपल्या हवामान अंदाजात नमूद केले आहे. यामुळे काढण्यासाठी आलेला सोयाबीन, मका तूर कापूस यांसारख्या जवळपास सर्वच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान या परतीच्या पावसामुळे होणार आहे.

अतिवृष्टीमधून बचावलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी बांधवांनी (Farmer) हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च केला. मात्र आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा खरीप हंगामातील पिकांची नासाडी केली आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या हवामान अंदाजानुसार, आजपासून राज्यात कडक सूर्यदर्शन होणार आहे. आजपासून परतीच्या पावसाचा जोर कमी होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. यामुळे निश्चित शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र असे असले तरी पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजामध्ये 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या मध्यमहाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात.
अशा परिस्थितीत 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी येणारा पाऊस हा द्राक्ष बागांसाठी घातक राहणार आहे. यामुळे निश्चितच येथील शेतकरी बांधवांना द्राक्षबागा सुरक्षित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून ठेवाव्या लागणार आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातून आता पाऊस माघारी जात आहे. पंजाबरावांनी आजपासून राज्यात सूर्यदर्शन होणार असल्याचे सांगितले आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीदेखील स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडू शकतो असे देखील पंजाबराव यांनी नमूद केले आहे.
मित्रांनो परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता पावसाची उघडीप राहणार असल्याने शेती कामाला वेग येणार असून खरीप हंगामातील नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी बांधव करणार आहेत.