Panjabrao Dakh : आजही राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता, पंजाबरावांचा इशारा

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात विश्रांती घेतलेला पाऊस (Rain) सप्टेंबर मध्ये चांगलाच कोसळत आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाचा (Maharashtra Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील विविध भागात अतिमुसळधार (Monsoon News) पावसाची नोंद केली गेली आहे.

कोकणात पावसाचा (Monsoon) जोर अधिक असल्याचे चित्र आहे. राजधानी मुंबई ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे राजधानी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे आणि नाशिक या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. याव्यतिरिक्त कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस बघायला मिळाला.

मराठवाड्यात देखील पावसाने हजेरी लावली असून मराठवाड्यातील लातूर परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला आहे. यामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने आज कोकणात पावसाची शक्‍यता राहणार असल्याचे नमूद केले असून पावसाची शक्यता लक्षात घेता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज राजधानी मुंबई ठाणे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाबराव यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तविले आपल्या सुधारित अंदाजानुसार आज 9 सप्टेंबर अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होणार आहे.

मित्रांनो पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार असून 18 सप्टेंबर पर्यंत राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी.

वीज पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी पावसाला सुरवात झाल्याबरोबर आपले घर जवळ करावे. पावसाची उघडीप झाली की शेतकरी बांधवांनी पीक व्यवस्थापनाची कामे करून घ्यावीत. निश्चितच पंजाबराव यांनी वर्तवलेला अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी थोडा दिलासादायक राहणार असून काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांना यामुळे नुकसान देखील सहन करावे लागू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe