Papaya Farming: शेती परवडत नाही असं वाटतं ना..! अहो मग पपईची बाग लावा, करोडपतीचं होणारं, फक्त पावसाळ्यात ‘हे’ काम कराव लागणार

Ajay Patil
Published:

Papaya Farming: देशातील शेतकरी बांधवांनी (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील उत्पन्नवाढीसाठी मोठ्या प्रमाणात फळबाग (Orchard Planting) लावत आहेत.

मित्रांनो आपल्या राज्यात वेगवेगळ्या फळांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. यात प्रामुख्याने डाळिंब, द्राक्ष, पपई, सिताफळ इत्यादी फळबाग वर्गीय पिकांचा समावेश आहे. राज्यात पपईच्या बागा देखील विशेष उल्लेखनीय आहेत. पपईची शेती (Papaya crop) शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर देखील ठरत आहे.

खरं पाहता पपईची शेती म्हणजे लाखो रुपयांची कमाई, असंच काहीस आहे. मात्र पावसाळ्यात रोगामुळे पपईच्या बागात प्रभावित होतात आणि पपईचे उत्पादनात लक्षणीय घट होते. अशा परिस्थितीत पपई उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.

आज आपण पावसाळ्यात पपई पिकावर लागणाऱ्या रोगांवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

पावसाळ्यात पपई बागेची अशी काळजी घ्या 

कृषी वैज्ञानिकांच्या मते, पावसाळ्यात फळबाग पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट कायम असते. पपई या फळबाग पिकावर देखील मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे भारतात सर्वत्र यावेळी पाऊस पडत आहे.

अशा परिस्थितीत, पपईला पाण्यापासून वाचवणे गरजेचे आहे, कारण पपईच्या शेतात 24 तास पाणी साचले तर पपई वाचवणे अशक्य होते. यावेळी पपईभोवती 4-5 इंच उंचीचा थर तयार करावा.

पपईचे रिंग स्पॉट विषाणू रोगापासून पपईचे संरक्षण करण्यासाठी, आठव्या महिन्यापर्यंत 0.5 मिली/लिटर स्टिकरमध्ये 2% निंबोळी तेल मिसळून एक महिन्याच्या अंतराने फवारणी करणे आवश्यक आहे. उच्च प्रतीची फळे आणि पपईच्या झाडांमध्ये रोग-विरोधी गुणधर्म निर्माण करण्यासाठी, आठव्या महिन्यापर्यंत युरिया 5 ग्रॅम, झिंक सल्फेट 04 ग्रॅम आणि बोरॉन 04 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून एक महिन्याच्या अंतराने फवारणी करणे आवश्यक आहे.

मित्रांनो आपल्या देशात पपईचा सर्वात घातक रोग, म्हणजे मुळ कुज याच्या व्यवस्थापनासाठी, हेक्साकोनाझोल 2 मिली औषध प्रति लिटर पाण्यात विरघळवून एक महिन्याच्या अंतराने माती पूर्णपणे भिजवणे आवश्यक आहे. वरील द्रावणाने माती भिजवून हे काम आठव्या महिन्यापर्यंत चालू ठेवावे. मोठ्या रोपाला भिजवण्यासाठी 5-6 लिटर औषधाचे द्रावण लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe