परभणीच्या शेतकऱ्याने तर कमालच केली! शेतामध्ये पिकवला चक्क 2 लाख 40 हजार रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा आंबा

Ajay Patil
Published:
miya zaki mango

सध्या शेतकरी शेतीमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करतात व या प्रयोगाच्या माध्यमातून अनेक पिकांचे वाण विकसित करतात. तसेच वेगवेगळ्या पिकांची लागवड पद्धती पासून  नियोजनापर्यंत अनेक प्रकारचे प्रयोग करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील घेतात.

तसेच शेतकऱ्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पिकवल्या जाणाऱ्या फळबागांची लागवड देखील महाराष्ट्रमध्ये यशस्वी करून दाखवलेली आहे.  यामध्ये आपल्याला उत्तर भारतात प्रामुख्याने थंड प्रदेशात पिकणाऱ्या सफरचंदाचे उदाहरण घेता येईल.

महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड देखील यशस्वी केलेली आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण  परभणीच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने कोकणच्या हापूस आंब्याला देखील मागे टाकेल अशा महागड्या आंब्याची शेती यशस्वी केली असून

या आंब्याचे दर दोन लाख 40 हजार रुपये प्रति किलो इतका आहे. या महागड्या आंब्याचे उत्पादन व शेतकऱ्याने कसे घेतले किंवा या आंब्याची शेती या शेतकऱ्याने कशी केली? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 परभणीच्या शेतकऱ्याने पिकवला दोन लाख 40 हजार रुपये प्रति किलो दर असलेला आंबा

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठामध्ये पहिल्यांदा पश्चिम विभागीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता व सध्या हा मेळावा सुरू असून उद्या पर्यंत म्हणजेच 23 फेब्रुवारी पर्यंत हा मेळावा सुरू असणार आहे.

जर आपण या मेळाव्याच्या आकर्षण पाहिले तर यामध्ये परभणीच्या शेतकऱ्याने पिकवलेला आंबा प्रमुख आकर्षण ठरला आहे. परभणी जिल्ह्यातील वरुड येथील चंद्रकांत देशमुख हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांच्या आनंदीता फार्मस मधून त्यांनी राज्य आणि विदेशातील जवळजवळ 79 आंब्याच्या वानांची लागवड करून यशस्वीपणे उत्तम पद्धतीने उत्पादन देखील घेतले आहे.

यापैकी त्यांनी एकूण बारा वाण या प्रदर्शनामध्ये ठेवले होते. म्हणजे यापैकी तीन वाण त्यांनी स्वतः संशोधित केलेले आहेत. यामध्ये या आंब्याची किंमत 3000 रुपयांपासून दोन लाख 40 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.

विशेष म्हणजे जपानमध्ये पिकवला जाणारा मिया झाकी आंब्याला त्या ठिकाणी दोन लाख 40 हजार रुपये इतका दर मिळतो. विशेष म्हणजे चंद्रकांत देशमुख यांच्या शेतामध्ये  हापूस आंब्यापेक्षा जास्त नफा मिळवून देऊ शकतील असे आंब्याचे वाण आहेत.

विशेष म्हणजे या सर्व आंब्यांमध्ये कोय नाही म्हणजेच ते सिडलेस आहेत. तसेच पुढच्या वर्षी चंद्रकांत देशमुख या सर्व आंब्याचे रोपे इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये चंद्रकांत देशमुख यांनी या आंब्याची शेती कोणत्या भागात करता येऊ शकते किंवा त्यांची काळजी कशी घ्यावी लागते? आंब्याची शेती शेतकऱ्यांना परवडणारी आहे का याबद्दलचे संपूर्ण माहिती  शेतकऱ्यांना दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe