Marigold Farming Tips: झेंडूच्या फुलांचे भरघोस उत्पादन हवे असेल तर वापरा ‘हे’ तंत्र! लाखो रुपयांची होईल कमाई

Ajay Patil
Published:

Marigold Farming Tips:- आजकाल शेती पद्धतीत अमलाग्र बदल झाला असून तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड यामुळे शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील प्रचंड प्रमाणात उत्पादन तर मिळवतातच. परंतु त्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती देखील चांगली होताना आपल्याला दिसून येत आहे.

शेतकरी आता पारंपारिक पिकांऐवजी वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके तसेच फळबाग लागवड व फुलशेतीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. यामध्ये फुलशेती ही शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असून कमीत कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी फुलशेती हा एक चांगला पर्याय आहे.

फुल शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकरी झेंडू आणि गुलाब फूल पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. फुले शेतीमध्ये अनेक टेक्नॉलॉजी असून जास्तीत जास्त फुलांचे उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष देणे यामध्ये खूप गरजेचे असते.

साहजिकच फुलांचे उत्पादन जास्त आले म्हणजे आर्थिक उत्पन्न देखील वाढते. याच अनुषंगाने या लेखामध्ये आपण झेंडू लागवडीबद्दल आणि भरघोस फुलांचे उत्पादन मिळवण्यासाठी कुठले तंत्र महत्त्वाचे आहे? याबद्दलची माहिती घेणार आहोत.

 झेंडूचे उत्पादन वाढण्यासाठी महत्त्वाचे असलेली पिचिंग पद्धत नेमकी काय आहे?

झेंडू फुलांची चमक तसेच त्यांचा आकार आणि फुलांची संख्या हे प्रामुख्याने झेंडूचे झाड आणि कळ्यांवर अवलंबून आहे. जितक्या योग्य पद्धतीने झेंडूचे व्यवस्थापन केले जाते त्यानुसार उत्पन्नात देखील वाढ होते. झेंडूच्या फुलांचे उत्पादन वाढवायचे असेल तर याकरिता कळी तोडणे म्हणजेच पिचिंग पद्धत खूप महत्त्वाची मानली जाते.

साधारणपणे झेंडूचे लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसांनी जमिनीमध्ये झेंडूची रोपे व्यवस्थितपणे सेट होतात. साधारणपणे लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी झेंडूच्या झाडांवर कळ्या आणि पाने मोठ्या प्रमाणावर असतात. अशा वेळेस जर फुले भरपूर यावे असे तुम्हाला वाटत असेल तर कळ्या खुडणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये झाडाची वरची कळी दोन पानासह हाताने खुडणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे झाडाच्या मुख्य देठापासून आधार देणाऱ्या कळ्या जास्त प्रमाणामध्ये निघतात

व त्यामुळे झाडाला अधिक फुले येतात. इतकेच नाही तर फुलांचा आकार देखील वाढतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी जर झेंडूचे उत्पादन वाढवायचे असेल तर पिचिंग पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

 अशा पद्धतीने करावे खत व्यवस्थापन

झेंडूची फुलांची संख्या वाढावी आणि चमकदार फुलांचे उत्पादन मिळावे याकरिता खत व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे. याकरिता शेतकरी बंधूंनी हेक्‍टरी 120 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावे.

यामध्ये पोटॅशची संपूर्ण मात्रा शेती तयार करताना द्यावी आणि त्यातल्या त्यात नत्राची अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि उरलेली मात्रा लागवडीनंतर 50 दिवसांनी द्यावी. या खतांच्या वापराने देखील झेंडूची झाडे बहरतात व मोठ्या प्रमाणावर नवीन कळ्या आपल्याला दिसू लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe