Pomegranate Farming : भारतात गेल्या काही दशकांपासून फळ शेतीला मोठी चालना दिली जात आहे. यामध्ये डाळिंब या फळ पिकाची लागवड वाढली आहे. महाराष्ट्रात या पिकाची सर्वाधिक शेती पाहायला मिळते. आपल्या राज्यात डाळिंबाच्या भगवा, आरक्ता, गणेश यांसारख्या विविध जातींची शेती केली जाते.
यामध्ये भगवा ही अशी जात आहे जी राज्यातील जवळपास सर्वच विभागात उत्पादीत केली जाते. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्रात उत्पादित होणारी फुले भगवा या जातींचे डाळिंब अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन वेबसाईटवर तब्बल 1000 रुपये किलो पर्यंत विक्री होत आहे.
या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर एका डाळिंबाच्या फळाला तब्बल दोनशे रुपयांचा रेट मिळत आहे. निश्चितचं हा दर किरकोळ बाजाराचा आहे मात्र या मीडियारिपोर्ट मध्ये असं नमूद करण्यात आल आहे की बहुतेक शेतकरी बांधव थेट या वेबसाईटवर डाळिंब विक्री करून चांगले उत्पन्न कमवत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या जातीच्या डाळिंबाविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.
डाळिंबाची फुले भगवा जात
फुले भगवाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात याला सेंद्र्या म्हणून ओळखल जात. राज्यातील इतर भागात याला अष्टगंध, मस्तानी, जय महाराष्ट्र आणि रेड डायना असं देखील संबोधित करतात. या जातींचे फळ सरासरी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत बनत असते. याच्या 250 ग्रॅम वजनाच्या फुले भगवा डाळिंबची किंमत ऑनलाइन शॉपिंग साइट्स वर 100 ते 800 रुपये किलो दरम्यान आहे.
साहजिकचं घाऊक बाजारात देखील याला चांगला दर मिळतो. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना त्याची व्यावसायिक लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे. मोठ्या आकाराचे, केशरी रंगाचीं ही जात 180 ते 210 दिवसात तयार होते. यामध्ये काही उपजाती अशा आहेत ज्या लवकर तयार होतात मात्र त्यांना बाजारात कमी दर मिळतो.
म्हणून शेतकरी ओरिजनल भगवा जात जी की सात महिन्यात उत्पादनासाठी तयार होते त्याची लागवड अधिक करतात. याच्या एकाच झाडापासून 1 ते 2 कॅरेट पर्यंतचे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच एका झाडापासून 40 किलो पर्यंतचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. उत्पादनात हवामानाच्या बदलानुसार कमी अधिक प्रमाण होत राहते.
या जातीची शेती कुठं केली जाते
फुले भगवा ही जात नवीन नाही. 2003-04 मध्ये ही जात रिलीज झाली आहे. आज सुमारे 20 वर्षांनंतर कर्नाटकपासून गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशपर्यंत मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जात आहे. फुले केशर जातीने एकट्या महाराष्ट्रात 86.1% क्षेत्र व्यापले आहे.
राज्यातील सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे आणि धुळे येथे शेतकरी फुले केशराची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. वास्तविक, महाराष्ट्रातील बहुतांश भागात या जातीसाठी योग्य माती आणि हवामान आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र स्वतः या जातीला प्रोत्साहन देत आहे.