प्रगतिशील युवा शेतकरी प्रणवभाऊ घेत आहे मिरची पिकाचे बंपर उत्पादन! अवघ्या 25 गुंठ्यात मिळेल 4 लाखाचे उत्पन्न

भाजीपाला पिकांचे वैशिष्ट्ये जर आपण बघितले तर या पिकांचा कालावधी हा खूप कमी असतो व बऱ्याचदा जर बाजारभाव चांगला मिळाला तर कमी कालावधीत लाखो रुपये उत्पन्न देण्याची क्षमता भाजीपाला पिकांमध्ये असते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून जर बघितले तर शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांकडे वळल्याचे दिसून येत आहेत.

Published on -

Chilli Cultivation:- भाजीपाला पिकांचे वैशिष्ट्ये जर आपण बघितले तर या पिकांचा कालावधी हा खूप कमी असतो व बऱ्याचदा जर बाजारभाव चांगला मिळाला तर कमी कालावधीत लाखो रुपये उत्पन्न देण्याची क्षमता भाजीपाला पिकांमध्ये असते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून जर बघितले तर शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांकडे वळल्याचे दिसून येत आहेत.

त्यातल्या त्यात आता अनेक तरुण शेतकरी शेती क्षेत्राकडे वळल्यामुळे शेडनेट किंवा पॉलिहाऊस सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेताना दिसून येतात.

अगदी याच पद्धतीने जर आपण वाळवा तालुक्यातील आष्टा येथील तरुण शेतकरी प्रणव शिंदे याची यशोगाथा बघितले तर त्याने अवघ्या 25 गुंठे क्षेत्रामध्ये मिरची लागवड केली असून ही मिरची लागवडीतून चार लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

प्रणव शिंदे या तरुणाने हिरव्या मिरची लागवडीतून घेतले लाखोत उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाळवा तालुक्यातील आष्टा येथील प्रगतिशील युवा शेतकरी प्रणव शिंदे यांनी हिरव्या मिरचीची लागवड केली व या मिरची लागवडीसाठी त्यांनी संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा व पद्धतींचा वापर केला. व्यवस्थित नियोजन ठेवल्यामुळे आज भरघोस असे मिरचीचे उत्पादन त्यांना मिळत असून मिरचीची तोडणी सध्या सुरू आहे.

जेव्हा प्रणव शिंदे यांनी हिरव्या मिरचीची लागवड करण्याचे ठरवले त्याआधी शेताची व्यवस्थित मशागत करून घेतली व संपूर्ण पंचवीस गुंठे क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कुजलेले शेणखत पसरवून घेतले व त्यानंतर नर्सरी मधून सप्टेंबर महिन्यात मिरचीचे चार हजार रोपे खरेदी केली.

लागवड करण्यासाठी त्यांनी पाच बाय सव्वा फूट अंतराची निवड केली व या अंतरावर मिरचीचे रोपे लावली. तसेच पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचा वापर केला व त्यामुळे आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर करता आला. जर आपण मिरची पिकाचा विचार केला तर यावर बुरशी तसेच सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो व यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होते.

वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव देखील मिरची पिकावर दिसून येतो. या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता वेळोवेळी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी केली. तसेच मिरची झाडांवर लागल्यानंतर वजनाने झाड मोडू नये याकरिता मिरचीच्या झाडाला आधार म्हणून काठी व तारेचा वापर केला.

तसेच मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव खूप कमी झाला व त्यामुळे पीक जोमात भरले व निंदनीचा खर्च देखील बऱ्यापैकी कमी होऊन उत्पादन खर्चात बचत झाली. हे सगळ्या प्रकारचे व्यवस्थापन ठेवल्यानंतर लागवडीनंतर 45 ते 50 दिवसानंतर मिरचीचे उत्पादन मिळायला सुरुवात झाली असून प्रत्येक तोड्यामागे उत्पादनात वाढ होताना दिसून येत आहे.

सध्या एका तोड्याला दीड क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत असून आतापर्यंत आठ तोडे पूर्ण झाले आहेत व त्या माध्यमातून पाच टन उत्पादन त्यांना मिळाले असून त्यापासून दीड लाख नफा मिळाला आहे.

अजून बारा टन मिरचीचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा प्रणवला असून मुंबईला ही मिरची विक्रीला जात आहे व त्या ठिकाणी 40 रुपये किलो बाजारभाव मिळत आहे. शेवटपर्यंत हाच बाजारभाव टिकून राहिला तर प्रणव यांना अवघ्या 25 गुंठ्यामध्ये चार लाख रुपयांचे उत्पादन मिळेल अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News