बाराशे रुपये किलो दराने विकली जाणारी भारतातील ‘ही’ आंब्याची जात नामशेष होण्याच्या मार्गावर! 3.5 किलो वजनाचा असतो एक आंबा

Published on -

महाराष्ट्रात एकंदरीत भारतात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असल्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून आंब्याला अतिशय महत्त्व आहे. भारतातील हापूस हा आंबा जगप्रसिद्ध असून संपूर्ण जगात या आंब्याला खूप मोठी मागणी असते हे आपल्याला माहिती आहे.

त्यासोबतच महाराष्ट्रातील कोकणात पाहिले तर हापूस, लंगडा, केशरी तसेच दशहरी  अशा अनेक आंब्याच्या प्रजाती आपल्याला आढळून येतात व या प्रत्येक प्रजातीचे वैशिष्ट्ये हे वेगवेगळे आहेत.परंतु भारतातील या प्रसिद्ध असलेल्या आंब्याच्या प्रजातींपैकी नूरजहाँ प्रजातीचा आंबा देखील तितकाच दुर्मिळ व महत्त्वाचा असून तो मध्य प्रदेश राज्यात प्रामुख्याने आढळून येतो.

 आंब्याची दुर्मिळ प्रजात नुरजहाँ नामशेष होण्याच्या मार्गावर

मध्यप्रदेश मध्ये प्रामुख्याने आढळून येणारा नूरजहाँ प्रजातीचा आंबा अतिशय दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण असून या प्रजातीच्या एका आंब्याचे वजन सुमारे साडेतीन किलो आणि त्याचा बाजारपेठेतील दर किलोला बाराशे रुपये इतका आहे. परंतु महत्त्वाची असलेली आंब्याची ही प्रजात सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून मध्यप्रदेश मधील अलीराजपुर जिल्ह्यात असलेल्या कट्टीवाडी या ठिकाणी या आंब्याच्या प्रजातीचे फक्त बोटावर मोजणे इतकी झाडे उपलब्ध आहेत.

त्यामुळे ही प्रजात नष्ट होऊ नये व ही प्रजात वाचावी याकरिता आता तेथील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून याकरिता शास्त्रीय पद्धतींचा आधार घेण्यात येत आहे. नूरजहाँ जातीचा आंबा हा त्याच्या मोठ्या आकारासाठी प्रसिद्ध असून त्याच्या एका फळाचे वजन साडेतीन ते साडेचार किलो पर्यंत असते

व बाजारामध्ये प्रति किलो 1000 पासून ते 1200 रुपये प्रतिक्रिया पर्यंत दर मिळतो. त्यामुळे आंब्याची प्रजात वाचवण्याकरिता खूप प्रयत्न केले जात असून वनविभागाला टिशू कल्चरच्या माध्यमातून नूरजहाँचे नवीन रोपे तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 अलीराजपूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती

अलीराजपुर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर.के.यादव यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, सध्या या ठिकाणी या प्रजातीच्या आंब्याची फलधारणा होऊ शकतील अशी फक्त दहा झाडे उरली असून या प्रजातीत वाढ व्हावी

याकरिता आम्ही हार न मानता पाच वर्षांमध्ये वृक्षारोपण करून ही संख्या दोनशे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असून कितीही प्रयत्न करून आम्ही ही आंब्याचे प्रजात नष्ट होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता या प्रयत्नांना कितपत यश येते हे येणाऱ्या भविष्यकाळातच ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!