Scheme For Farmer:-:कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणी व इतर आवश्यक गोष्टींकरिता शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.
कृषी क्षेत्रामध्ये शेतीमालाशी संबंधित अनेक पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. मात्र अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. म्हणून सरकार कडून काही योजना राबवल्या जातात व या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात मदत केली जाते.
अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी पायाभूत सुविधा निधी योजना होय.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या शेतीमालाशी संबंधित व महत्त्वाचे असलेले कोल्ड स्टोरेज, शेतीमालावर आधारित प्रक्रिया युनिट तसेच गोदामे व तयार माल पॅकिंग करण्यासाठी आवश्यक पॅकेजिंग युनिट उभारण्यासाठी त्याच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
तसेच या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज कमाल सात वर्षांसाठी दिले जाते व या कर्जावर जे काही व्याज आकारण्यात येते त्या व्याजात तीन टक्के पर्यंत सूट देखील दिली जाते. त्यामुळे ही एक महत्वपूर्ण योजना असून या लेखात आपण या योजनेबद्दल माहिती घेऊ.
कृषी पायाभूत सुविधा निधी योजना आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची
सरकारच्या माध्यमातून कृषी पायाभूत सुविधा निधी योजना राबवली जात असून या माध्यमातून प्रक्रिया युनिट तसेच पॅकेजिंग युनिट व गोदाम तसेच कोल्ड स्टोरेज याकरिता शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयापर्यंत कर्ज दिले जात असून ते सात वर्षांकरिता दिले जात आहे.
नाही तर या कर्जावरील व्याजामध्ये तीन टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून जो काही निधी उपलब्ध होतो तो कृषी क्षेत्राचा विकास व्हावा व त्यामधील सुधारणा यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वापरला जातो. या योजनेचा उद्देशच मुळात हा आहे की कृषी पायाभूत सुविधांचा विकास करणे व त्यासंबंधी असलेल्या आवश्यक बांधकामांमध्ये गुंतवणूक करणे.
कृषी क्षेत्राचा विकासासाठी या गोष्टींना मिळते या योजनेतून मदत
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचे तांत्रिक ज्ञान, आर्थिक आणि इतर संबंधित सेवा उपलब्ध करून दिले जातात. हे अंतर्गत कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिट तसेच गोदाम, पॅकेजिंग युनिटची उभारणी करता यावी याकरिता दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना दिले जाते
व सात वर्षासाठी दोन कोटी रुपयांपर्यंतच्या या कर्जावर तीन टक्के पर्यंत व्याजात सवलत देखील दिली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे.
कसा घ्याल या योजनेचा लाभ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेची अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी पूर्ण माहिती वाचून तुम्ही ती संपूर्णपणे भरणे गरजेचे आहे आणि संपूर्णपणे माहिती भरून झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करताच तुमची नोंदणी होते.
तुमची नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराची दोन दिवसांनी कृषी मंत्रालयाकडून पडताळणी केली जाते व यानंतर तुम्हाला इतर काही महत्त्वाच्या आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्याकरिता बँकेशी संपर्क साधावा लागतो.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अजून पुरेशी माहिती बँकेकडून मिळते व ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर बँकेच्या माध्यमातून 60 दिवसात कर्जाची प्रक्रिया पूर्ण होते.