Soybean Farming : भारतात खरीप हंगामात (Kharif Season) सोयाबीन (Soybean Crop) या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Cultivation) केली जाते. आपल्या राज्यातही सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो राज्यातील मराठवाड्यात, विदर्भात तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर शेंगा गळण्याची समस्या दिसून येत आहे. सतत हवामानात होत असलेल्या बदलांमुळे तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकातील शेंगांची गळ (Soybean Disease) होत असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो सोयाबीन पिकात पाणी साचल्यामुळे तसेच पाण्याच्या निचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे, सोयाबीनच्या झाडांच्या मुळांमध्ये पुरेशा वायुवीजन (अॅनेरोबिक) नसल्यामुळे शेंगा पडण्याची समस्या उद्भवते. बियान बोगस असले तरी देखील अशी परिस्थिती उद्भवत असल्याचे जाणकार नमूद करतात.
अतिवृष्टी आणि पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिकात रोगराईलाही अनुकूल परिस्थिती निर्माण होते. सध्या अशा स्थितीत वायुवी अंगमारी (मुटपान्स थ्रश) नावाचा आजारही दिसून येत आहे. या रोगात पानांवर व शेंगांवर हलके जांभळे डाग पडतात व अशा स्थितीत शेंगा गळू लागतात.
शेतकरी मित्रांनो जर तुमच्या ही सोयाबीन पिकात अशी समस्या निर्माण झाली असेल तर चिंता करू नका. कारण की आज आम्ही सोयाबीन पिकात होणारी शेंगा गळ कशा पद्धतीने नियंत्रणात (Soybean Crop Management) आणली जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन पिकात शेंगा गळ कशा पद्धतीने नियंत्रणात आणायची.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर सोयाबीन पिकात पाणी साचलं असेल तर शेतकरी बांधवांनी शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. तसेच हवेतून होणार्या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्साकोनाझोल किंवा टेब्युकोनाझोल 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकावर सेमीलूपर आणि हरभरा अळीचा प्रादुर्भाव असतानाही शेंगा पडू लागतात आणि अशा शेंगांना छिद्रे पडतात. त्यांच्या प्रतिबंधासाठी, शेतकरी बांधवांनी एमॅमेक्टिन बेंझोएट 200 ग्रॅम किंवा 150 मिली फ्लुबेन्डामाइड किंवा क्लोरोट्रानिलपायरॉल प्रति हेक्टरी फवारणी करावी.
मित्रांनो कोणत्याही औषधाची कोणत्याही पिकावर फवारणी करण्या अगोदर तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही याची काळजी घ्यावी.