Soybean Market Price : संपूर्ण भारत वर्षात तेलबिया पिकांची (Oilseed Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन (Soybean Crop) हे देखील एक प्रमुख तेलबिया पीक असून या पिकाची आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात शेती आहे.
आपल्या राज्यात देखील सोयाबीन या नगदी पिकाची (Cash Crop) खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र अधिक असल्याने राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव कायमच सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Rate) मोठे बारीक लक्ष ठेवून असतात. आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांच्या सोयीसाठी कायमच सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Prices) घेऊन हजर होत असतो.
आज देखील आपण 24 ऑगस्टचे ताजे सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना सोयाबीन विक्रीला नेण्यापूर्वी सोयाबीन बाजारातील चित्र समजेल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया 24 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील काही प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सोयाबीनला मिळालेला बाजारभाव.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती:- 24 ऑगस्ट रोजी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन वाजेपर्यंत 1325 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समिती सोयाबीन ला कमीत कमी पाच हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चौदा रुपये प्रति क्विंटल एवढा होता. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 982 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- विदर्भातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 399 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीत चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत-कमी बाजार भाव मिळाला असून 5802 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव या बाजार समितीत यात करण्यात आला आहे. तसेच सोयाबीनला पाच हजार 589 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव या बाजार समितीत मिळाला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 295 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल थोडा कमीत कमी बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार 782 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव आज या बाजार समितीत सोयाबीनला मिळाला आहे. तसेच पाच हजार 541 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज सोयाबीनला या बाजार समितीत मिळाला.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती विशेषता सोयाबीनच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. या बाजार समितीत आज 6560 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीत पाच हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून सहा हजार सतरा रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजारभाव सोयाबीनला मिळाला आहे तसेच पाच हजार 970 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या बाजार समितीत पाहायला मिळाला.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज 1513 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज या बाजारात सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीतकमी बाजार भाव मिळाला असून सहा हजार 55 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे तसेच 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला आज मिळाला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती:- वासिम एपीएमसीमध्ये आज तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज सोयाबीनला मिळाला आहे.