Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) अनेक समस्यांना तोंड देत आहेत.
यामध्ये निसर्गाचा लहरीपणा (Climate Change) हा प्रमुख असून शेतकरी बांधवांना शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे देखील शेतीमध्ये लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागतो.
मात्र जर शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करून त्याला योग्य नियोजनाची सांगड घातली तर आजच्या काळात देखील शेतीमधून लाखों रुपयांचे उत्पन्न कमावले जाऊ शकते.
कृषी तज्ञ शेतकरी बांधवांना पीक पद्धतीत बदल करून ज्या पिकांची बाजारात कायम मागणी असते अशा पिकांची शेती करण्याचा सल्ला देत असतात.
नांदेड मधील एका अवलियाने देखील शेती व्यवसायात बदल करून लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. नांदेडच्या एका डॉक्टरांनी योग्य नियोजन आणि आपल्या अपार कष्टांनी माळरानावर फळबाग लागवड (Orchard Planting) करून दाखवली आहे.
मित्रांनो तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे नांदेड शहरालगत बी डी चव्हाण नामक व्यक्तीने जे की व्यवसायाने डॉक्टर आहेत त्यांनी माळरानावर जांभळाची लागवड (Purple cultivation) केली होती.
आता या माळरानावर लावण्यात आलेल्या जांभळाला जांभूळ (Purple) लगडलेले असून यातून तब्बल वीस लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या जांभळासाठी रासायनिक खतांचा वापर केलेला नाही म्हणजेच त्यांनी सेंद्रिय पद्धतीने जांभूळ लागवड केली आहे.
मित्रांनो खरं पाहता आजच्या काळात शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे.
त्यामुळे सुरुवातीला उत्पादन वाढते मात्र आता उत्पादनात घट होत आहे शिवाय शेत जमिनीचा पोत देखील कमालीचा ढासळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी झिरो बजेट फार्मिंग तसेच सेंद्रिय शेती करणे अतिशय महत्त्वाची बनली आहे.
डॉ. चव्हाण यांनी देखील जांभूळ लागवड केल्यानंतर रासायनिक खतांचा वापर न करता केवळ योग्य पाणी व्यवस्थापन करून जांभूळ शेतीतून चांगले उत्पादन मिळवण्याची किमया साधली आहे.
त्यामुळे पंचक्रोशीत चव्हाण यांच्या शेतीची मोठी चर्चा रंगली आहे. तीन वर्षांपूर्वी लावलेल्या जांभूळ पिकातून चव्हाण यांना यावर्षी वीस लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाची आशा आहे.
शिवाय हे जांभूळ त्यांना शंभर वर्ष असेच उत्पादन देत राहणार आहे.तीन वर्षांपूर्वी चव्हाण यांनी आपल्या आठ एकर क्षेत्रात 7 हजार जांभळाची झाडे लावली होती.
विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणत्याही रासायनिक खतांचा तसेच किटक नाशकांचा व औषधांचा वापर केला नाही. फक्त योग्य नियोजन करून पाणी व्यवस्थापन केले आणि आपल्या अपार कष्टांनी जांभळाची शेती माळरानावर यशस्वी करून दाखवली.
यामुळे डॉक्टर यांना उत्पादन खर्च अतिशय कमी आला असून उत्पादित झालेल्या मालास चांगला दर्जा मिळाला आहे. निश्चितचं शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत असतो. एकंदरीत डॉक्टर यांनी मिळविलेले हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणार आहे.