Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) योग्य नियोजन केले तर यशाला निश्चितच गवसणी घालता येते. पारंपरिक पिकांपेक्षा नगदी (Cash Crop) तसेच फळबाग पिकांची लागवड निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते. हेच दाखवून दिले आहे हरियाणा (Hariyana) मधील दोन दोस्तांनी.
हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील मौजे अहरी येथील संदीप आणि मौजे दादनपूर येथील अजय या दोन मित्रानी शेतीमध्ये (Agriculture) बदल करत लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) केली आहे. हे दोघे युवा शेतकरी सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहेत. मित्रांनो खरं पाहता संदीपने आपल्या नात्यातल्या व्यक्तीकडून पेरूच्या लागवडीची (Guava Farming) माहिती गोळा केली आणि त्यानंतर दोन एकरात पेरूची बाग लावली.
दर्जेदार बियाणे व देशी खताचा वापर करून चांगले उत्पादन घेतले. या पट्ठ्याने पेरूच्या शेतीतुन वर्षाकाठी एका एकरातून दीड लाख रुपये कमवून दाखवले आहेत. पेरूच्या शेतीतुन चांगले उत्पन्न मिळाल्याने दोन एकरावरून आता थेट आठ एकरावर पेरूची शेती केली जात आहे. संदीपला मिळालेल्या यशामुळे प्रभावित होऊन त्याचा मित्र अजय देखील आता पेरूची शेती करू लागला आहे. अजयने आपल्या चार एकरात पेरूची बाग लावली आहे. आज दोन्ही मित्र वार्षिक 15 लाख रुपये कमवत आहेत. यामुळे हे दोघ नवयुवक इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होत आहेत.
अहरी गावातील शेतकरी संदीपने आपला अनुभव कथन करतांना सांगितले की, तो जोंडी गावात त्याच्या नातेवाईकाकडे दहा वर्षांपासून राहत होता. त्यावेळी त्याने तेथील शेतकऱ्यांकडून पेरू बागेची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अमदलपूर गावात दोन एकरात पेरूची बाग लावली. चांगल्या प्रतीचा पेरू लावला जो खायला गोड आणि चविष्ट होता. विशेष म्हणजे त्याने सेंद्रिय शेतीवर अधिक जोर दिला आणि त्याने पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेणखत वापरले.
वेळेवर पेरणी, खते आणि सिंचन दिले परिणामी चांगले उत्पन्न मिळाले. त्यांच्या पेरूची बाजारात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत त्याला अधिक भाव मिळत आहे. चांगला नफा मिळत असल्याने तो दरवर्षी दोन एकरांनी बाग वाढवत राहिला. सध्या त्याने आठ एकर क्षेत्रात पेरूची शेती सुरु केली असून या बागेतून त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे.
त्याची शेती आणि चांगला नफा पाहून त्याचा मित्र अजयही प्रभावित झाला. त्याने देखील चार एकरात पेरूची बाग लावली आहे आणि आज तो देखील वर्षाला चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमवत आहे. अजयने सांगितले की, पेरूच्या बागा पारंपरिक शेतीपेक्षा दरवर्षी जास्त बचत करतात. अजय या शेतकऱ्याने 4 एकर क्षेत्रात पेरूची बाग लावली आहे. एक एकर फळबागा कंत्राटावर देण्यात आली आहे.
दोन्ही मित्रांनी सोबतच रोपवाटिका सुरू केली
दोन्ही मित्रांनी सोबतच दोन वर्षांपूर्वी रोपवाटिका सुरू केली, त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात सर्वजण रोपे लावत होते. त्यावेळी त्यांनी नर्सरी सुरू करण्याचा विचार केला. लोकांचा चांगला कल लक्षात घेऊन त्यांनी रोपवाटिकेत फळझाड, सावलीची रोपे आणि भाजीपाल्याची रोपे तयार केली आहेत. या रोपवाटिकेतून त्यांना वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
अजयने सांगितले की तो, आपली नर्सरी अधिक आधुनिक बनवण्याच्या तयारीत आहे. त्याच्या मते, आधुनिक नर्सरीमुळे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या नर्सरीत भाजीपाल्याची रोपे सदैव तयार राहणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. साधारण वर्षभरात ही रोपवाटिका तयार होईल. रोपवाटिकेत तयार फळे आणि सावलीची रोपे 20 रुपयापासून ते 1 हजार रुपयांपर्यंत विकली जातात.