Successful Farmer: देशात गेल्या अनेक वर्षांपासून फुल शेती (Farming) केली जात आहे. विशेष म्हणजे अल्प कालावधीत तयार होणाऱ्या फुलशेतीच्या (Floriculture) माध्यमातून शेतकरी बांधव (Farmers) चांगली कमाई (Farmer’s Income) देखील करत आहेत.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत असतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी बाजारात ज्या पिकांची कायम मागणी असते अशाच पिकांची शेती केली पाहिजे.
अशा परिस्थितीत फुलांना बाजारात बारामही मागणी असते यामुळे निश्चितच फुलशेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. फुलशेती शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे एक शास्वत साधन बनू शकते.
झारखंडमध्ये देखील एका शेतकऱ्याने फुलशेतीच्या माध्यमातून चांगली कमाई केली आहे. झारखंड मध्ये अनेक शेतकरी फुलशेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे.
फुलशेतीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात नफा चांगला मिळतो. झारखंडच्या मंदार ब्लॉकमधील रहिवासी गंडुरा ओराव नामक शेतकऱ्याने देखील फुलांच्या शेतीतून लाख रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.
इतर पारंपरिक पिके आणि भाजीपाला लागवडीपेक्षा फुलांची लागवड उत्तम असल्याचे सांगितले जाते शिवाय फुलशेतीमध्ये कोणतेही नुकसान नसते.
सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात फुले येतील अशा पद्धतीने फुलशेतीची सुरवात करावी असा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात.
मित्रांनो सुरवातीला गांडुरा ओराव यांनी झेंडूच्या फुलांची शेती (Marigold Farming) करण्यास सुरूवात केली होती. यानंतर गांदुरा यांनी गुलाब, जरबेरा (Gerbera Farming) आणि ग्लॅड्युल्सची फुलशेती करण्यास सुरुवात केली.
गांडुरा ओराव यांचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत आहेत. वारसा हक्काने त्यांना शेती मिळाली असून शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी करिअर म्हणून देखील शेतीची निवड केली.
अगदी लहानपणापासून ओराव यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी शेती व्यवसायातच आपले भविष्य शोधण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी सुरवातीला पारंपरिक पीक, भाजीपाला घेऊनच आपले व आपल्या परिवाराचे पोट भरता येईल, असे त्यांना वाटले.
मात्र त्यानंतर त्यांनी शेती व्यवसायात आमूलाग्र बदल केला आणि ते फुलशेतीकडे वळले. आज गांडुरा दीड ते दोन एकरात झेंडूच्या फुलाची लागवड करत आहेत.
जरबेरा आणि ग्लॅड्युलसची शेती सुरू केली
झेंडूच्या फुलांच्या शेतीत चांगले नेत्रदीपक यश मिळाल्यानंतर यशाने प्रोत्साहित होऊन गंडुरा ओरावने कृषी विभागाच्या योजनेंतर्गत पॉलिहाऊसची उभारणी केली.
त्यानंतर त्यांनी तेथे जरबेरा फुलाची लागवड सुरू केली. जरबेरा फुलांची शेती ही कमाईच्या दृष्टीने खूप खास मानली जाते, कारण जर एखाद्या शेतकऱ्याने जरबेरा फुलाची लागवड 30X30 शेडमध्ये केली तर त्याला सहा महिन्यांत दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
गांडुरा ओराव हे जरबेराच्या फुलाची लागवड त्यापेक्षा अधिक शेतजमिनीत करत आहेत. गंडुरा ओरावन आपली फुले रांची, गुमला आणि लोहरदगा येथील बाजारात पाठवतात.
ते सांगतात की, पूर्वी ते गुलाबाची लागवड करायचे, पण त्यात काही अडचण येत होती, त्यामुळे आता फक्त जरबेरा आणि झेंडूच्या फुलांचीच लागवड केली जाते.
गंडुरा ओराव हे यशस्वी शेतकरी आहेत
गंडुरा ओराव हे झारखंडच्या यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक आहेत. उत्तम कृषी कार्यासाठी त्यांना झारखंड रत्न हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
याशिवाय, प्रगत शेती तंत्र शिकण्यासाठी झारखंड सरकारने इस्रायलला पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या टीमचाही तो भाग होता. गांडुरा फुलांच्या लागवडीबरोबरच पिके आणि भाजीपालाही घेतात.
ते बियाणे देखील तयार करतात. याशिवाय ते पशुपालनही करतात. इतकंच नाही तर आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देतात.
त्यामुळेच नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत पंचायत समिती सदस्यपदी त्यांनी विजय मिळवला आहे. निश्चितच गंडुरा ओराव यांना शेतीमध्ये मिळालेले हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे.