Success: फौजी पिता अन इंजिनिअर पुत्राचा नांदच खुळा…!! पडीत जमिनीत शेती सुरु केली, आज लाखोंची कमाई

Ajay Patil
Published:

Successful Farmer: देशात एकीकडे शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात सतत नुकसान सहन करावे लागतं असल्याने शेती व्यवसायाला तोट्याचा म्हणतं त्यापासून दुरावत चालले आहेत.

तर दुसरीकडे असेही अनेक लोक आहेत ज्यांची पृष्ठभूमी शेतीची नसताना देखील ते शेतीव्यवसायात चांगले नेत्रदीपक यश संपादन करत आहेत.

राजस्थानच्या एका निवृत्त लष्करी जवानाने (Retired Military Officer) देखील शेतीमध्ये चांगली उत्कृष्ट कामगिरी करून लाखों रुपये उत्पन्न कमविण्याची किमया साधली आहे.

रिटायर्ड फौजीने (Retired soldier) तीन वर्षांच्या अथक परिश्रमाने आपली नापीक जमीनीला लाखो रुपयांच्या उत्पन्नाचे (Farmers Income) साधन बनवले आहे.

या रिटायर्ड फौजी व त्यांच्या सुपुत्राने फळांची बाग लावली आहे. विशेष म्हणजे यावर्षी या पिता पुत्रांनी 20 लाख रुपयांची फळे विकली आहेत.

मित्रांनो झुंझुनू शहरापासून 11 किमी अंतरावर बुडाना येथील जमील पठाण नामक शेतकऱ्याने ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. बुडाणा येथे या रिटायर्ड फौजीचे शेत आहे.

2015 मध्ये सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर प्रॉपर्टीचे काम सुरू केले. त्यानंतर ओसाड पडलेल्या नापीक जमिनीवर पारंपरिक शेती केली जात होती, परंतु कोणत्याच पिकातून योग्य उत्पादन मिळतं नव्हते.

त्यानंतर त्यांनी शेतीमध्ये (Farming) काहीतरी नवीन करण्याचा विचार केला अन या पडीक पडलेल्या नापीक जमिनीवर फळबाग (Orchard Planting) उभारण्याची कल्पना त्यांना आली.

2017 मध्ये 60 बिघा क्षेत्रात हंगामी, किन्नू आणि लिंबूची 8 हजारांहून अधिक रोपे लावली. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर फळबाग तयार झाली. त्यानंतर 2020 मध्ये 15 लाख रुपयांची फळे तयार करण्यात आली.

गतवर्षी 20 लाखांची फळे विकून 5 लाखांहून अधिक नफा कमावला होता. आता रिटायर्ड फौजी जमील इतर शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देत आहेत.

अभियंता मुलाच्या कल्पकतेने नशीब बदलले

रिटायर्ड फौजी यांचा अभियंता मुलगा जुनैदही जमील पठाणला शेतीमध्ये मदत करत आहे. हे दोघी पितापुत्र शेतीत नवनवीन शोध लावत राहतात. त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आत्मसात करून शेतात 50 हून अधिक विविध फळे आणि औषधी वनस्पती लावल्या आहेत.

शेखावती येथे तयार केली फळांची मोठी बाजारपेठ

जमील यांनी फळांच्या लागवडीबरोबरच शेखावती येथे सर्वात मोठा फळबाजार देखील निर्माण केला आहे. झुंझुनू व्यतिरिक्त सीकर, चिरावा आणि नवलगढ येथील मंडईंमध्येही जमील फळांचा पुरवठा करत आहेत.

याशिवाय त्यांची फळे व्यापारी जयपूर मंडीत पाठवतात. एवढेच नाही तर त्यांना फोनवरूनही ऑर्डर मिळत आहेत. निश्चितचं जमील यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायद्याचा ठरत असून पडीक पडलेल्या जमिनीत यशस्वी फळबाग लागवड करून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe