Success: शेती करावी तर अशी! ‘हा’ अवलिया आंब्याची शेतीतुन करतोय वर्षाकाठी 18 लाखांची कमाई; वाचा या यशाचे रहस्य 

Ajay Patil
Published:

Successful Farmer: भारत हा खरं पाहता एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. आपला देश शेतीप्रधान देश म्हणून आपण मोठ्या गर्वाने कथन करत असतो.

शेतीप्रधान देश असल्याचा आपण गर्व देखील केला पाहिजे आणि त्याचा स्वाभिमान देखील बाळगला पाहिजे. मात्र या शेतीप्रधान देशात गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा शेती व्यवसायात येत असलेल्या नानाविध अडचणीमुळे कर्जबाजारी झाल्याचे वास्तव देखील आपल्याला नाकारता येणार नाही.

शेतीमध्ये राबराब राबून देखील अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी दडपशाहीमुळे, शासनाच्या काही चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा नेहमीच भरडला जातो. परिणामी शेतीसाठी आलेला खर्च काढणे देखील बळीराजासाठी अशक्य बनते.

बळीराजा कर्जबाजारी बनतो अन शेवटी अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Farmer Suicide) सारखा निर्णय घेतात. मात्र असे असले तरी अनेक शेतकरी बांधव शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करत, बाजाराचा अंदाज घेत, त्याला योग्य नियोजनाची सांगड घालत चांगले नेत्रदीपक यश संपादन करतात.

शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई (Farmers Income) करतात आणि इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होतात. सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur District) सोलापूर दक्षिण तालुक्यातील एका शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायात काळाच्या ओघात नावीन्यपूर्ण बदल घडवून आणील आंबा लागवडीतून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे दर्गनहळ्ळी येथील रहिवासी शेतकरी केदारनाथ बिराजदार या नवयुवक शेतकऱ्याने शेतीतून दर वर्षी 18 लाख रुपये कमावण्याची किमयाही साधली आहे. केदारनाथ बिराजदार यांनी नोकरी मागे न धावता शेती व्यवसायात करिअर घडवण्याची ठरवले.

या अनुषंगाने त्यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर वडिलोपार्जित शेती आंबा लागवड (Mango Farming) केली. आंबा लागवड (Mango Cultivation) करताना आंब्याची सुधारित जात केशरची (Kesar Mango) निवड केली. आंबा लागवड केल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला अन आज आंब्याचे यशस्वी उत्पादन घेत आहेत.

शेती व्यवसायात उंच भरारी घ्यायची असेल तर पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देणे अतिशय महत्त्वाचे आहे. शेती व्यवसायातील यशाचे हे गमक केदारनाथ यांना सुरुवातीलाच ज्ञात झाले. यामुळे त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला.

फळबाग लागवड करायची मग आंब्याची शेती करू असे ठरवले आणि मग काय हापूस नंतर सर्वाधिक मागणी मध्ये असलेल्या केशर आंब्याची लागवड केली. तीन वर्षानंतर केशर आंब्याला आता आंबे लगडले असून आता बिराजदार यांचा केशर आंबा चक्क सातासमुद्रापार विक्रीसाठी जात आहे.

केदारनाथ बिराजदार यांच्या मते, शेती व्यवसायात जर यशस्वी व्हायचे असेल तर एका रात्रीत यश संपादन करणे अशक्य आहे. शेतीमध्ये अहोरात्र काबाड कष्ट केल्यानंतर आणि कष्टाला योग्य नियोजनाची सांगड घातल्या नंतर यशाला निश्चितच गवसणी घालता येणे शक्‍य असते.

बिराजदार सांगतात की दुसऱ्याकडे नोकर बनून दहा हजार रुपये कामविन्यापेक्षा आपल्या काळ्याआईची सेवा करणे कधीही उत्तम. शेती व्यवसायात पारंपारिक पीक पद्धती अवलंबली तर उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य बनणार आहे.

मात्र जर फळबाग लागवड केली  त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर निश्चितच यातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य बनते. बिराजदार यांनीदेखील शेतीव्यवसायात हाच फंडा उपयोगात आणला आणि आज वार्षिक 18 लाख रुपयांची कमाई ते अंबा लागवडीतून करीत आहेत.

निश्चितच बिराजदार यांचे हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे सिद्ध होणार आहे आणि भविष्यात बिराजदार यांच्या प्रमाणेच उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधव शेती व्यवसायात मोठा आमूलाग्र बदल करतील यात तिळमात्रही शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe