Farmer Success Story:- प्रयोगशीलता हा गुण व्यक्तीमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे व हा गुण असणारे व्यक्ती हे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होतात. वेगवेगळे गोष्ट करून पाहणे व त्यासाठी कित्येक कालावधी करिता अभ्यास व संशोधन असे व्यक्ती करत असतात.
असे प्रयोग आता इतर क्षेत्रांसोबत कृषी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी करताना आपल्याला दिसून येतात. या माध्यमातून अनेक नवनवीन पिकांचे वाण विकसित होतात. याच मुद्याला धरून जर आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या फुलेनगर येथील उमेश खामकर या तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने अर्ध्या एकरामध्ये चक्क लाल ऐवजी पांढरा स्ट्रॉबेरीची लागवड करून ती यशस्वी देखील करून दाखवलेली आहे.
पांढरा स्ट्रॉबेरी चे उत्पादन हे लाल स्ट्रॉबेरी म्हणजे सामान्य स्ट्रॉबेरीच्या तुलनेत सहापट जास्त येते असा देखील दावा केला जात आहे.
त्यामुळे स्ट्रॉबेरी लागवडीतून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न देखील वाढण्यास मदत होईल. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु पांढरे स्ट्रॉबेरीची लागवड उमेश खामकर यांनी करून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.
उमेश खामकर यांनी केली पांढरी स्ट्रॉबेरीची लागवड
यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन पांढरा स्ट्रॉबेरीचा प्रयोग केल्याचे प्रगतिशील शेतकरी उमेश खामकर यांनी सांगितले. पारंपारिक पिकांना तिलांजली देत त्यांनी नवा प्रयोग केला व याकरिता नोव्हेंबर 2023 मध्ये या स्ट्रॉबेरीची दहा हजार रोपांची लागवड केलेली असून त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
नोव्हेंबर मध्ये लागवड केल्यानंतर साधारणपणे जानेवारी महिन्यात या स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले व सध्या त्यांची विक्री सातारा व इतर काही ठिकाणी केली जात आहे.
तसेच लवकरच ऑनलाईन प्लेटफॉर्मच्या माध्यमातून देखील या पांढरे स्ट्रॉबेरीची विक्री केली जाईल असे देखील त्यांनी म्हटले. सध्या या स्ट्रॉबेरीला 250 रुपये किलो इतका दर मिळत आहे.
पांढरी स्ट्रॉबेरी लागवड देशातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा
स्ट्रॉबेरीची ही फ्लोरिडा पर्ल जात असून ती अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रथम लागवड करण्यात आली व ग्राहकांच्या देखील ती पसंतीस उतरली. भारतामध्ये हा पहिलाच प्रयोग केल्याचा दावा देखील उमेश खामकर यांनी केला आहे.
याकरिता त्यांनी फ्लोरिडा विद्यापीठाचे रॉयल्टी हक्क विकत घेतलेले आहेत. म्हणजेच आता जर कुणालाही ही पांढरी स्ट्रॉबेरी लागवड करायची असेल तर तुम्हाला उमेश खामकर यांची अगोदर परवानगी घेणे गरजेचे राहील.
काय आहे या स्ट्रॉबेरीच्या फ्लोरिडा पर्ल जातीचे वैशिष्ट्ये?
इतर स्ट्रॉबेरीच्या ज्या काही जाती आहेत त्यांची तुलना केली तरीही नैसर्गिकरित्या अतिशय गोड अशी स्ट्रॉबेरी आहे. तिच्यातील असलेल्या पौष्टिक गुणधर्मामुळे ती आरोग्यासाठी देखील फायद्याचे आहे. पांढरी स्ट्रॉबेरी कमी आंबट असल्यामुळे ग्राहकांमध्ये प्रसिद्ध होत आहे.
ही सुरुवातीला पांढरी असते आणि पिकल्यावर हलकी गुलाबी होते व त्यामुळे परदेशातील लोकांना देखील ते आवडते व भारतातील ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे.