Successful Farmer: मित्रांनो देशात रब्बी हंगाम (Rabbi Season) संपला असून आता शेतकरी बांधव (Farmers) आपला शेतमाल विक्री करत आहेत.
ज्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी बाजारात आपला गव्हाचे उत्पादनही (Wheat Production) विकले आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Farming) करत असतात.
राज्यातील शेतकरी बांधव देखील गव्हाची सध्या विक्री करत आहेत. यंदाच्या मार्च महिन्यात सततच्या कडाक्याच्या उन्हामुळे गव्हाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून, त्यामुळे गव्हाचे उत्पादन सामान्य उत्पादनापेक्षा कमी झाले आहे.
काही राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन सरासरी उत्पादनापेक्षा जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाले आहे, असे असतानाही अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना गव्हाचे बंपर उत्पादन मिळाले आहे.
वास्तविक, मध्य प्रदेशातील माळवा भागात मार्चच्या पहिल्या आठवड्यात गव्हाची काढणी (Wheat Harvesting) सुरू होते. त्यामुळे मार्च महिन्यातील उन्हाचा परिणाम येथील पिकावर झालेला नाही.
मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील चिल्लोड पिपलिया गावातील शेतकरी वल्लभ पाटीदार यांनी प्रतिकूल हवामानातही गव्हाचे बंपर उत्पादन घेतले आहे. वल्लभ पाटीदार यांनी बोलताना सांगितले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. असे असतानाही त्यांनी सुमारे 75 क्विंटल प्रति हेक्टर दराने त्यांनी गव्हाचे उत्पादन घेतले आहे.
पुसा तेजस या जातीच्या गव्हाची केली पेरणी
शेतकरी वल्लभ पाटीदार यांनी सांगितले की, ते गेल्या 2 वर्षांपासून “पुसा तेजस HI 8759” या जातीची गव्हाची पेरणी करत आहेत.
त्याचे उत्पादन आणि रोग प्रतिकारशक्ती इतर गव्हाच्या वाणांपेक्षा खूप जास्त आहे. यंदा गव्हाचा हंगाम चांगला नसतानाही त्याचा उत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही.
या शेतकऱ्याने पुढे सांगितले की, या वाणाचे गव्हाचे उत्पादन यंदा सुमारे 75 क्विंटल प्रति हेक्टर दराने मिळाले आहे.मित्रांनो गव्हाच्या या जातीची कमाल उत्पादन क्षमता 75.5 क्विंटल प्रति हेक्टर असली तरी, त्याचे सरासरी उत्पादन 57 क्विंटल प्रति हेक्टर आहे.
मात्र माळवा विभागातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी या वाणाचे प्रति हेक्टरी 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे. या जातीची स्टेम आणि पानांच्या तांबेरा रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता अधिक आहे. यामुळे हे वाण शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहे.
गव्हाच्या या वाणाची माहिती शेतकऱ्याला कोठून मिळाली
या प्रश्नाचे उत्तर देताना शेतकऱ्याने सांगितले की, त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील मंदसौर येथील कृषी विज्ञान केंद्रातून पुसा तेजस प्रजातीच्या गव्हाची माहिती मिळाली होती.
त्यांनी पुढे माहिती दिली की, मंदसौर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.जी.एस. चुंडावत यांनी या जातीच्या लागवडीबाबत माहिती दिली असता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याने या जातीची लागवड केली आहे.
पुढे, शेतकऱ्याने सांगितले की या जातीचे प्रमाणित बियाणे त्यांना कृषी विज्ञान केंद्रानेच उपलब्ध करून दिले आहे.निश्चितच वल्लभ यांनी गव्हाच्या या जातीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले असून इतर शेतकऱ्यांनी देखील या जातीच्या पेरणीचा विचार केला पाहिजे. शिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा एकदा अवश्य सल्ला घेतला पाहिजे.