Wheat Farming : देशात रब्बी हंगामाला सुरवात झाली आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधव रब्बी हंगामाकडे वळला आहे. खरं पाहता या वर्षी शेतकरी बांधवांना खरीप हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधव आता खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे वळला आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करत असतात. रब्बीमध्ये गव्हाची देखील शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. गहू हे रब्बी हंगामात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे.
![wheat farming](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-19-at-3.09.46-PM.jpeg)
या पिकाची संपूर्ण भारत वर्षात शेती केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील या पिकाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केल्यास त्यांना बक्कळ नफा माझ्या पिकातून मिळणार आहे.
निश्चितच कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित वाणाची पेरणी किंवा लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्रात लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या गव्हाच्या एका सुधारित जाती विषयी.
एच. आय. १६३३ (पुसा वाणी) :- पुसा वाणी ही गव्हाची एक सुधारित जात आहे. या जातीची पेरणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बागायती जमिनीमध्ये उशिरा पेरणीसाठी विकसित करण्यात आली आहे. म्हणजेच या जातीची पेरणी ही 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान केली जाऊ शकते.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी कालावधीत ही जात उत्पादन देण्यासाठी तयार होते. जाणकार लोकांच्या मते अवघ्या शंभर दिवसात ही जात उत्पादन देते. या जातीच्या गहू पिकाची उंची ही मात्र ७८ सें. मी. पर्यंत असल्यामुळे पीक पडत नाही. साहजिकच वादळ वारा यांसारख्या संकटांना पेलण्यासाठी ही जात सक्षम आहे. सरासरी उत्पादन: ४१.७ क्विंटल प्रति / हेक्टर मिळत असल्याचा दावा जाणकार लोकांकडून करण्यात आला आहे. मात्र आनुवंशिक उत्पादन क्षमता : ६५.८ क्विंटल प्रति / हेक्टर एवढं आहे.
कृषी तज्ञ नमूद करतात की गव्हाची ही सुधारित जात एचडी २९३२, राज ४०८३ आणि एचडी ३०९० पेक्षा अधिक उत्पादन देण्यासाठी ओळखली जात आहे. या जातीच्या गव्हात अधिक प्रमाणात प्रथिने (१२.४ %), लोह (४१.६ पीपीएम), आणि जस्त (४१.१ पीपीएम), आढळून आले आहे. या जातीच्या गव्हामध्ये असलेले सदर घटक मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असून या जातीच्या गव्हापासून उत्तम दर्जाची चपाती देखील बनवली जाते.