केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी महिनाभरापूर्वी सरकारी तूर विक्री करण्याची घोषणा केली होती व त्याकरिता त्यांनी एका ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ देखील केला होता. त्यामुळे शेतकरी बंधूंना आता केंद्र सरकारच्या या ई-समृद्धी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन तूर विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता तूर विक्रीसाठी कुठेही जाण्याची गरज नसून जर नाफेडला तूर विक्री करायची असेल तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अगदी सहजपणे तूर विक्री करू शकणार आहात.
म्हणजे सरकारच्या जाहीर हमीभावाने ही तूर खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण नाफेड कडे जर तुम्हाला तूर विकायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करू शकतात? याबद्दलचे महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
नाफेडकडे तूर विक्रीकरिता अशाप्रकारे करा नोंदणी
1- तुम्हाला देखील नाफेडकडे तूर विकायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे व याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला https://esamridhi.in/#/ या संकेतस्थळावर जाणे गरजेचे आहे.
2- या ठिकाणी गेल्यावर हे संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन आणि एजन्सी रजिस्ट्रेशन असे दोन प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी असतात.
3- यातील तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायाची निवड करून त्यावर क्लिक करायचे आहे.
4- त्यानंतर तुमच्यासमोर फार्मर रजिस्ट्रेशन/ लॉगिन बॉक्स ओपन होतो.
5- त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड टाकायचा आहे.
6- या ठिकाणी विचारलेली संपूर्ण माहिती भरून नाफेडला तूर विक्रीसाठीची नोंदणी करायची आहे.
7- अशाप्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होते व नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक मेसेज येतो.
अशाप्रकारे आहे नाफेडच्या माध्यमातून तूर विक्रीची पद्धत
1- अगोदर नोंदणी महत्वाची– नाफेड कडे ऑनलाईन तूर विक्रीची नोंदणी करणे खूप सोपे आहे व ते तुम्ही संगणक किंवा तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून देखील करू शकतात. केंद्र सरकारच्या ई-समृद्धी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असणार आहे. त्यामध्ये तुमच्या जमिनीची माहिती तसेच आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती तपासली जाते.
2- अशाप्रकारे आहे तूर खरेदीची प्रक्रिया– नोंदणी पूर्ण केल्यानंतर माहिती ही समृद्धी पोर्टलवर जाते. त्यानंतर नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तुरीसाठी एक युनिक नंबर जारी केला जातो व त्या पोर्टलवर तुम्हाला तुर विक्री करण्यात आल्याचे अपडेट देखील मिळणार आहे. तुमचे तुरीचे जे काही गोण्या असतात त्यांना क्यूआर कोड जारी केला जातो व या कोडच्या माध्यमातून नाफेडला तुमच्या तुरीची ऑनलाईन पद्धतीने गुणवत्ता समजते.
3- विक्रीनंतर तुरीचे पैसे कसे मिळतात?- तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून पीएफएमएस अर्थात सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवेच्या माध्यमातून थेट बँक खात्यात तूर विक्रीचे पैसे जमा केले जातात.