अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात १० वीचा १०० % निकाल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यामध्ये २०२०-२१ च्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल रेकॉर्डब्रेक शंभर टक्के लागला आहे. तालुक्यातील सर्व ५ हजार ८८८ विद्यार्थी पास झाल्यामुळे यावर्षीचा निकाल तालुक्यात शंभर टक्के लागला.

विशेष मुल्यांकन पद्धतीने जाहीर झालेला निकाल सर्वच विद्यार्थी व पालकांना आनंददायी ठरला. कोरोनाचे पार्श्वभूमीवर सगळीकडे दडपण असताना तिसरी लाट येण्याच्या बातम्या येत असताना शिक्षण विभागाने यावेळी मात्र नेवासे तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना व पालकांना आनंदाची बातमी दिली.

यावर्षी नेवासे तालुक्यातील सर्व शाळा मिळून व उर्दू, इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी या चारही मिडियममधून ५ हजार ८८८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पात्र होते.

परंतु कोरोनाच्या वर्षात शाळा सुरू झाली नाही. परीक्षाही झाली नाही. त्यामुळे मुल्यांकन पद्धतीचा वापर करून मार्क देताना हे विद्यार्थी पास झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News