लग्न सोहळ्यात आढळले २२ कोरोना बाधित !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील कणगर येथे झालेल्या लग्न समारंभात २२ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली.

बाधित रुग्णांमध्ये नवरदेव, नवरीसह कलवऱ्यांचा समावेश असून या रुग्णांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. लग्न समारंभानंतर नवरदेवाला त्रास जाणवू लागल्याने डाॅक्टरांकडे तपासणी करण्यात आली.

यावेळी कोविड चाचणीत नवरदेव कोरोना बाधित अाढळला. घटनेची खबर मिळताच महसूल व आरोग्य प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन कोविड तपासणी केली.

यामध्ये बाधितांची संख्या २२ असल्याचे उघड झाले. रविवारी दिवसभरात राहुरी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५६ झाली असून यामध्ये कणगर येथील २२ रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या पंधरवाड्यापासून राहुरी तालुक्यात बाधितांची संख्या कमी होत चालली असताना कणगर येथील २२ जणांची भर पडली.

जुलै २०२० ते १३ जून २०२१ या कालावधीत राहुरी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १३ हजार ३७८ झाली असून १२ हजार ९१४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले.

उपचारादरम्यान २३७ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत राहुरी तालुक्यात बाधितांची संख्या २ हजार ९६३ झाली होती.

१ फेब्रुवारी ते २३ जून कालावधीत राहुरी तालुक्यात १० हजार ४१५ बाधित आढळले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४ महिन्यांतच बाधितांची संख्या चौपट झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News