अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- पत्नीस माहेरी पाठविण्यास पतिने नकार दिल्याने त्यास पत्नीचे नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे त्याने राहते घरी आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत रोहित लांडगे यांची आई शिवा बाई यांनी दिल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयताची सासू व पत्नीस या गुन्ह्यात पूर्वीच अटक करण्यात आली पण अन्य 3 फरारी आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
यामध्ये रावसाहेब बोरूडे (वय 19), मोईन अमीर शेख (वय 31), सिमा रावसाहेब बोरूडे (तिघे रा. डिग्रस ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, रोहित लांडगे याची पत्नी शिवानी ही नेहमी डिग्रस येथील तिच्या माहेरी जात असे.
15 एप्रिल रोजी रोहित याची सासू बिट्टबाई मारूती शिनगारे व छकुल्या बोरूडे हे शिवानी हिला घेण्यासाठी वरवंडी येथे आले. पत्नीला घेण्यासाठी नेहमी छकुल्या बोरूडे हाच का येतो? असा प्रश्न रोहित याने सासू बिट्टबाईला विचारत पत्नीला माहेरी पाठविण्यास नकार दिला.
याचा राग मनात धरून छकुल्या याने त्याच्या अन्य साथीदारांना त्याठिकाणी बोलून घेत रोहितला मारहाण केली होती. यानंतर 16 एप्रिल रोजी रोहितने आत्महत्या केली होती. याप्रकरणी रोहितची आई शिवाबाई कचरू लांडगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या
फिर्यादीवरून रोहितला आत्महत्येस प्रवृत्त करणारी त्याची सासू, पत्नी, छकुल्या बोरूडे व इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी यापूर्वी रोहितची सासू बिट्टबाई व पत्नी शिवानीला अटक केली आहे. दरम्यान आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उर्वरित तिघांना अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम