३० वर्षीय युवकाला आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले नवे आयुष्य !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- कर्जत-जामखेडच्या नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पवार नेहमीच कार्यरत आहेत. मतदारसंघातील लोकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना, समस्यांना प्राधान्याने सोडवण्यासाठी आमदार पवार तत्पर आहेत.

जामखेड येथील सतीश अप्पासाहेब माने या ३० वर्षीय युवकाला आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्याने नवे आयुष्य मिळाले. सतीशचा काही महिन्यांपूर्वी अपघात होऊन सतीशच्या पायाला जबर दुखापत झाली.

त्याच्या पायामध्ये रॉड बसवावा लागला. वेगवेगळे वैद्यकीय उपचार करूनही जखम भरून न आल्याने पायामध्ये विष तयार होऊन पाय पूर्ण निकामी होण्याची भीती निर्माण झाली. माने कुटुंबातील सदस्यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क केला.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सतीशला पुण्यातील रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले. परंतु तेथे उपचार होऊनही सतीशच्या प्रकृतीत कुठलीही विशेष सुधारणा झाल्याचे दिसून आली नाही.

त्यानंतर बारामती येथील भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. २४ जून रोजी सतीशवर डॉ. भंडारे यांनी स्किन ग्राफ्टींगची शस्त्रक्रिया केली. सतीशचा जो पाय कापावा लागणार होता, मात्र तसे करण्याची वेळ आली नाही. आता सतीश पूर्ण बरा झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe