अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जिल्हा रुग्णालयातील करोना तपासणी प्रयोगशाळा (लॅब) सुरू झाल्यापासून 450 दिवसांत 5 लाख आरटीपीसीआर तपासण्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे.
या प्रयोगशाळेत दररोज 3000 चाचण्या होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांनी दिली. 22 मे 2020 रोजी जिल्हा रुग्णालयात नगर जिल्ह्यातील पहिली आरटीपीसीआर लॅब चालू झाली.
त्यानंतर चाचण्यांचा वेग वाढला व अहवाल हाती येण्याचा काळही घटला. त्यास आता 450 दिवस उलटले आहेत. या काळात एकही दिवसाची सुट्टी न घेता दिवस रात्र ही लॅब कार्यरत आहे.
डॉ.पोखरणा यांच्यासह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वसंत जमदाडे, डॉ. सुवर्णामाला बांगर, डॉ.भूषणकुमार रामटेके, डॉ. महावीर कटारीया, डॉ.मनोज घुगे,
डॉ नरेंद्र पाटील, डॉ. साहिल शेख, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. प्रताप साळवे, डॉ. चेतना जोशी यांच्यासह लॅब तंत्रज्ञ, लॅब सहायक, डेटा एन्ट्री टीम, सपोर्ट स्टाफ परीश्रम घेत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम