अहमदनगर शहरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-एमआयडीसीतील दांगट मळ्यात १७ ते १८ जून दरम्यान घरफोडीची घटना घडली. नवीनकुमार पांडे यांच्या घरी ही चोरी झाली.

श्री.पांडे यांच्या घरातील २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास अण्णा कुऱ्हाडे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव), गणेश भगवान कुऱ्हाडे व आकाश डाके या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पांडे यांच्या घराची कडी व कोयंडा तोडून सदरील इसमांनी आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन घेवून जात असताना फिर्यादीने आण्णा कुऱ्हाडे यास पकडले.

तसेच गणेश भगवान कुऱ्हाडे यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो व त्याचा नातेवाईक याने तोंडावर चाकू मारुन पोबारा केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोसई. पाठक हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe