अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी कर्जत पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका युवकाला या टोळीने सावज केले. ही परभणी येथील टोळी तेथे लग्न जमवण्यासाठी गेली आणि लग्न जमवले.
या लग्नासाठी या टोळीने नवऱ्या मुलांकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले. लग्न उरकण्यात आले. काही दिवसात नवरी मुलीने पोबारा केला.
यावेळी यातील नवऱ्या मुलाकडील लोकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याची कल्पना दिल्याने पोलिस निरीक्षक यादव यांनी आपल्या कौशल्याने एक पथक नियुक्त करून परभणी येथे जाऊन त्या टोळीतील दोन जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून साठ हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. यातील नवरी असणाऱ्या मुलीचे यापूर्वी तीन वेळा लग्न झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावेळी कर्जत पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील,
अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
पोसई भगवान शिरसाठ, पोलिस जवान मारुती काळे, तुळशीदास सातपुते, सागर म्हेत्रे, भाऊ काळे, गणेश भागडे, गणेश ठोंबरे, संपत शिंदे यांनी केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|