राहुरीचे दिवंगत पञकार देठे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील पत्रकार कैलास देठे यांचे कोरोना आजाराने अकाली निधन झाले होते.त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी राहुरी तालुक्यातील पत्रकार मित्रांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.

पञकार मिञांच्या अकाली निधनाने त्या कुटूंबियांला उभारी मिळावी म्हणून इतर पञकारांनी स्वयंस्फुर्तीने हा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी देठे यांच्या निवासस्थानी बहुतांशी पञकारांनी एकञ येत कैलास देठे यांच्या पत्नी सविता देठे,भाऊ सुभाष देठे यांच्याकडे ६८ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला.

व या दुखःतुन सावरण्यासाठी धीर देत देठे कुटूंबियांचे सांत्वन केले.याप्रसंगी ना.शिवाजी ढवळे,सुनिल भुजाडी,राजेंद्र वाडेकर,अशोक काळे,बाळासाहेब नवगिरे,वेनुनाथ शिंदे,प्रभाकर मकासरे,रमेश बोरूडे,गणेश विघे,सुनिल करपे, गोविंद फुणगे,

राजेंद्र आढाव,बाळकृष्ण वाघ,गोरक्षनाथ शेजुळ,अनिल कोळसे,वसंत आढाव,रफिक शेख,रियाजभाई देशमुख,निसारभाई सय्यद,विलास कुलकर्णी,बंडु म्हसे,हरीभाऊ दिघे,विजय डौले, प्रसाद मैड,श्रीकांत जाधव,सचिन ठुबे, समिर शेख, दिपक दातीर, राजु म्हसे,विनीत धसाळ,अनिल देशपांडे,बाळासाहेब कांबळे,

रहेमान शेख,बाळासाहेब रासने, दत्ताञय तरवडे,गणेश अंबिलवादे,शरद पाचरने,संतोष जाधव आदिंसह मानोरी येथील उपसरपंच शिवाजी थोरात,सुनिल भुजाडी(सर),नंदकुमार दिघे(सर),बाळासाहेब पाचरने(सर),अमोल पाटील(सर),विशाल तागड(सर),दत्ताञय साळवे(सर) उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe