अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. यातच अनेकदा भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे.
यातच राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारात उसात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोंढवड शिवारात दत्तात्रय बाळकृष्ण म्हसे या शेतकऱ्याच्या उसात त्यांचा मुलगा उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेला असता उसाच्या सरी मध्ये त्याला मृत बिबट्या दिसला.
मयत बिबट्या पाहताच त्याने तात्काळ वन खात्याला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरीला रवाना केला
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम