अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
मात्र तरीही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे.
नेवासा तालुक्यात करोना संक्रमण फैलावण्याचा वेग वाढला असून काल एका दिवसातील संक्रमणाने अर्धशतकाचा आकडा ओलांडला आहे.
काल 22 गावांतून एकूण 51 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3438 झाली आहे.
नेवासा तालुक्यात सोमवार 22 मार्च ते रविवार 28 मार्च या सात दिवसांच्या कालावधीत करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली.
21 मार्च अखेर तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3216 होती. ती काल रविवार 28 मार्च अखेल 3438 वर पोहचली. अशाप्रकारे सात दिवसात 222 बाधितांची भर पडली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|