अहमदनगर ब्रेकिंग : बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शेवगाव मधील बहुचर्चित हत्याकांडातील दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान अनैतिक संबधातून बाबपुसाहेब घनवट याची हत्या करण्यात आली होती.याप्रकरणी आरोपी पुनमसिंग भोंड (मयत),

कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे (तिघेही रा.रामनगर, शेवगाव) यांना जन्मठेप व प्रत्येकी 11 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 7 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि,

7 ऑगस्ट 2019 रोजी शेवगाव-पाथर्डी रोडवरील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयासमोर असलेल्या जामा मश्जिद ट्रस्टच्या मोकळ्या जागेवर राहत असलेली वनिता यशवंत मुळेकर हिचे पालावर मयत बापुसाहेब घनवट रात्री 10:30 वा.चे सुमारास गेला असता त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले आरोपी परमेश्वर पुनमसिंग भोंड,

कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे यांनी बापुसाहेब घनवट याचे वनिता मुळेकर हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून त्याला मारहाण करून,

त्याचे तोंड दाबुन झोपडी पाठीमागील गवतात ओढत घेवुन जावुन मोठया लोखंडी खिळयाने चेहर्‍यावर वार करून ठार मारले.

दुसर्‍या दिवशी सकाळी सदर घटनेबाबत मयताचे भाऊ काकासाहेब एकनाथ घनवट याने शेवगाव पोलीस स्टेशनला अज्ञात इसमांविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याप्रकरणी वरील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे साहेब यांचे न्यायालयात झाली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe