नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई ; सात दुकाने केली सील

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची भयानक आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

मात्र अनेकजण कोरोनाच्या नियमनाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. पाषाणावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी साडेपाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

सात दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली. याबाबत अधिक सविस्तर उरत असे कि, जामखेड येथील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता प्रांताधिकारी अर्चना नष्टे

यांनी आठवडे बाजारच्या दिवशी (गुरुवारी) विनामास्क फिरणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी साहेबराव कोकणी आदी उपस्थित होते. यावेळी साडेपाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

सात दुकानांना सात दिवस सील करण्यात आले. येथील कानिफनाथ यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News