अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : ‘त्या’ चौघांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सावेडी उपनगर भागात भिस्तबाग परिसरातील नयन राजेंद्र तांदळे याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी ही माहिती दिली. नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल साळवे, अक्षय ठोंबरे, शाहुल पवार व अमोल पोटे, अशी आरोपींची नावे आहेत.

दरम्यान या टोळीतील गुन्ह्यांचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील अक्षय चखाले यांनी सुपे पोलिस ठाण्यात मालमत्तेसाठी दमदाटी व बळाचा उपयोग केल्याची फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी तपास करून तांदळे टोळीविरोधात मालमत्तेवरून दरोडेखोरीचा गुन्हा नोंदविला होता, तसेच नयन तांदळेसह पाच जणांना अटक केली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी “मोक्‍का’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तपास वर्ग केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe