अहमदनगर ब्रेकिंग : बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटामध्ये एक 45 वर्षाच्या वयाचा व्यक्तीचा मृतदेह आढळला असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, बेवारस आढळून आलेला मृत्देह कोणाचा व कशामुळे मृत्यू झाला आहे याबाबत पोलीस तपास घेत आहेत.

पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटात असणाऱ्या झाडीत सकाळी आठच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.

सदर बेवारस मृत व्यक्ती हा मजुरीचे काम करत असल्याचे पेहरावावरून दिसून येत आहे मृत्यूनंतर त्यास घाटातील झाडीत आणून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे

पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक घनश्याम बळप सहाय्यक उपनिरीक्षक हनुमंत उगले पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे सत्यम शिंदे गहीनाथ यादव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe