अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-दोन विवाहित तरुणींचा त्यांच्या नवऱ्यानी खून करण्याचा खळबळजनक प्रकार नगर शहर व पारनेर तालुक्यात घडल्याने विवाहित तरुणी नवऱ्याकडून किती त्रास सहन करतात व त्यातून त्यांची हत्या देखील होते हे भयाण वास्तव स्त्री अत्याचाराचे समोर आले आहे.
या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील केदारेश्वर ठाकरवाडी येथे राहणारा व हल्ली चौधरीवाडी ढवळपुरी, ता. पारनेर येथे राहणार विवाहित तरुण पोपट मारुती जाधव, वय ३४ याने त्याची पत्नी सो. नंदा पोपट जाधव,
वय २६ हिच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेवून तिच्या पोटात असलेले मृल हे त्याचे नसून कुणाचेतरी दुसर्याचे आहे, असा संशय मनात धरून बेदम मारहाण करुन बायको नंदा हिला जीवे ठार मारुन खून केला.
तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने पाईनचा तलाव धोत्रे बु. येथे घेवुन जावून तिच्या पोटाला दगड बांधून तो बायकोचा मृतदेह पाण्यात टाकून दिला. हा खळबळजनक खुनाचा प्रकार २९ माचंच्या राजी घडला.
मयत नंदा पोपट जाधव, या तरुणीचा भाऊ सुरेश सीताराम केदारे, धंदा शेती, स. चिखलठाण, ता. राहुरी याच्या फिर्यादीवरून आरोपी पोपट मारुती जाधव याच्याविरुद्ध पारनेर पोलिसात खुनाचा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डिवायएसपी पाटील,
पोनि बळफ यांनी भेट दिली. आरोपी पोपट जाधव याला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत नगर शहरात एमआयडीसी भागात ब्रिज इंडस्ट्रीजचे सिक्युग्टी कॅबिनमध्ये ३ एप्रिलच्या रात्री विवाहित तरुणी सौ . लता संतोष पटोरकर,
वय २२ या विवाहित तरुणीस घरगुती कारणातून वैयक्तीक कारणातून आरोपी नवरा संतोष पटोरकर, क्य २८ याने पत्नी ‘लता हिचा कशानेतरी गळा आवळून तिला जिवे ठार प्रारून तिचा खून केला. याप्रकरणी भागिदाथ सुर्यभान कराळे, रा. वडगाव गुप्ता,
ता, नगर या तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा संतोष पटोरकर याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपी पाटील यांनी भेट दिली. आरोपी नवरा संतोष पटोरकर याला अटक करण्यात आली असून सपोनि आठरे हे पुढील तपास करीत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|