अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- बलात्कार झालेल्या एका युवतीने मानसिक त्रासातून स्वत: चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथे घडली आहे.
या प्रकरणी पिडीत युवतीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

file photo
याबाबत सविस्तर माहिती अशी कि बोल्हेगाव परिसरात 17 वर्षीय युवती आपल्या आई- वडिलांसोबत राहत होती. या युवतीवर कोणीतरी अज्ञात इसमाने अत्याचार केला. यामुळे सदर युवती गर्भवती राहिली होती.
अत्याचार झालेल्या युवतीला आपण गर्भवती राहिल्याचा धक्का बसला आणि याच मानसिक त्रासातून तीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपविले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम