अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शेतीला पाणि देण्याच्या कारणावरून सख्या भावाने व पुतण्याने ज्ञानेश्वर आढाव यांना लाथा बूक्क्यांनी व लाकडी खोऱ्याने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना ६ एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील माहेगांव येथे घडली आहे.
याबाबत राहुरी पोलीसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील माहेगांव येथे

फिर्यादी दत्ताञय आढाव यांचे मयत भाऊ ज्ञानेश्वर पुंजाहरी आढाव यांना फिर्यादीचे शेतातील बोरवेलचे पाणी त्यांच्या शेतात घेवुन जायचे होते. त्यासाठी मयत ज्ञानेश्वर आढाव हे आरोपी विष्णु पुंजाहरी आढाव याच्या शेतातुन पाईप जोडीत होते.
यावेळी आरोपी विष्णु पुंजाहरी आढाव प्रतिक विष्णु आढाव दोघे राहणार माहेगांव ता. राहुरी. हे त्या ठिकाणी आले. आणि मयत ज्ञानेश्वर यांना म्हणाले की, तु आमचे शेतातुन पाईप जोडु नको. असे म्हणुन यातील त्यांनी मयत ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्कानी मारहाण केली.
तसेच लाकडी दांडके असलेल्या लोखंडी खोऱ्याने व लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली. यावेळी ज्ञानेश्वर आढाव यांना तातडीने अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत राहुरी पोलिसात विष्णु पुंजाहरी आढाव व प्रतिक विष्णु आढाव या दोघांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत. राहुरी तालुक्यात काल एकाच दिवशी खुणाच्या दोन घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवर अंकुश राहिला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|