अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील संक्रापुरचे सरपंच रामा पांढरे यांना 8 ते10 जणांच्या टोळक्याने लोखंडी फायटर,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या मारहाणी मागे वाळू तस्करी व रस्त्याचा वाद असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राहुरी पोलिस सुञाकडून मिळालेल्या माहिती नुसार रस्त्याच्या कामाची पाहणी करीत असताना संक्रापूर येथिल ग्रामस्थांनी तु येथे का आला याचा जाब विचारत असताना
हमरीतुरी सुरु झाली. या ठिकाणी आणखी दहा ते बारा ग्रामस्थ जमा झाले.हमरी तुमरीचे रुपांतर मारामारीत झाले. सरपंच रामा पांढरे यांना फायटर व लोखंडी गजाने जबर मारहाण करत कुटुंबाला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली.
हि घटना शुक्रवारी दुपारी संक्रापूर येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संक्रापुर लांडेवाडी येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजे दरम्यान रामा पांढरे यांना संजय संपत जगताप, नबाजी राधाकिसन जगताप, सुरेश नारायण जगताप, बाबुराव संपत जगताप, ज्ञानदेव संपत जगताप, गोकुऴ राधाकिसन जगताप, अर्जुन भाऊसाहेब होन,
राजेंद्र संजय जगताप, नारायण गोकुळ जगताप सर्व (रा. लांडेवाडी संक्रापुर ता.राहुरी)आदींनी जबर मारहाण केली. संक्रापूरचे सरपंच रामा पांढरे यांच्यासह काही जण गावातील रस्त्याचे कामाची पाहणी करण्यासाठी आले असता
येथिल ग्रामस्थांनी गैरकायद्याची मंडऴी जमवुन पांढरे यांना म्हणाले की, तु येथे का आला तु परत येथे येवू नको यावर सरपंच नात्याने रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. असे म्हणताच येथिल ग्रामस्थांनी सरपंच पांढरे यांना शिवीगाऴ करण्यास सुरुवात केली.
पांढरे यांनी तुम्ही शिवी गाऴ करु नका असे म्हणताच यातील संजय जगताप याने पांढरे यांच्या डोक्यात लोखंडी फायटर मारले.नबाजी जगताप याने लोखंडी गजाने पांढरे यांच्या पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली.
रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पांढरे यांच्या समवेत आलेल्या काही जणांनी वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता त्यांना हि लाकडी दांड्याने व लाथाबुक्कानी मारहाण करुन शिवीगाऴ करुन पुन्हा
येथे आलातर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जीवंत सोडणार नाही असा दम दिला आहे. मारहाणीत पांढरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व पाकीट गहाऴ झाले आहे. पुढील तपास पो.ना जायभाय हे करीत आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम