अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- राहुरी कारखाना येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर इंधन खाली करण्यासाठी आलेल्या टँकरने पेट्रोल भरुन घरी चालेल्या दुचाकी चालकास समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाला.
हा अपघात दुपारी 1 वाजता डाँ.तनपुरे कारखाना पेट्रोल पंपाच्या आवारात घडला.याबाबत माहिती अशी की, राहुरी कारखाना येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे हे टि.व्हीएस स्टार क्रमांक एम एच 17 ऐयु 4812 मध्ये पेट्रोल टाकुन निघाले असता
डिजेल खाली करण्यासाठी आलेला टँकर क्रमांक एम एच 41 ऐयु 5124 ने दुचाकीस्वारास समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे (वय42)हे गंभीर जखमी झाले होते.
त्यांना प्राथमिक उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम मध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी नगर येथे नेत असताना उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे नगर येथील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले.
टँकर चालक हा पोलीस ठाण्यात हजर झाला असून राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून अपघातसमयी साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे, शांती चौक मिञ मंडळाचे दिपक ञिभुवन, पिंटु सोनी,
अक्षय साळुंके भूषण नालकर, पत्रकार गणेश विघे यांच्यासह शांती चौक मिञमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. मयत बापू साळुंके हे राहूरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेत नोकरी करत होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ दोन मुली, मुलगा असा मोठा परिवार आहे. दत्तात्रय साळुंके यांचे ते बंधू होत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|