अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ, चोवीस तासांत वाढले तब्बल एवढे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९६ हजार ४९४ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११६३७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५४९ आणि अँटीजेन चाचणीत ८२५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७१, अकोले १०३, जामखेड ०८, कर्जत ३७, कोपरगाव ६४, नगर ग्रामीण ३६, नेवासा १२, पारनेर ३८, पाथर्डी २९, राहता १०, राहुरी ०७, संगमनेर १५१, शेवगाव २६, श्रीगोंदा २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ३८, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०२, अकोले ०९, जामखेड ०३, कर्जत ०४, कोपरगाव २९, नगर ग्रामीण ३९, नेवासा ०५, पारनेर ०८, पाथर्डी २२, राहाता ८४, राहुरी ०७, संगमनेर ४४, शेवगाव २६, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ८२५ जण बाधित आढळुन आले. मनपा १३८, अकोले १६, जामखेड ३६, कर्जत १६०, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ११२, नेवासा ३८, पारनेर २४, पाथर्डी ६३, राहाता २३, राहुरी ९३, संगमनेर ०३, शेवगाव ५१, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ३२, कॅन्टोन्मेंट बोर्ड १२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३६२, अकोले ६३, जामखेड ३२, कर्जत ५०, कोपरगाव १४४, नगर ग्रामीण ५८, नेवासा १००, पारनेर २८, पाथर्डी ६५, राहाता ६३, राहुरी ५१, संगमनेर ६४, शेवगाव ५३, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर ९१, कॅन्टोन्मेंट ३९, मिलिटरी हॉस्पिटल ०२, इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:९६४९४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:११६३७
  • मृत्यू:१२७०
  • एकूण रूग्ण संख्या:१,०९,४०१
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe