अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ६९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ०५३ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.३१ टक्के इतके झाले आहे.दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३४७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५८९४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७५३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४५४ आणि अँटीजेन चाचणीत १४० रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८६, अकोले १६, जामखेड ४०, कोपरगाव ३८, नगर ग्रामीण ४१, नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी ५४, राहता ४४, राहुरी २६, संगमनेर ३०, शेवगाव ६२, श्रीगोंदा ५२, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट बोर्ड १९, मिलिटरी ०३ इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५८, अकोले ०४, जामखेड ०२, कर्जत ०४, कोपरगाव ६२, नगर ग्रामीण २६, नेवासा ०६, पारनेर ०७, पाथर्डी ०२, राहाता ६६, राहुरी १८, संगमनेर ३६, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट ०७ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १४० जण बाधित आढळुन आले. मनपा ०९, अकोले ०१, जामखेड १८, कर्जत ०३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०९, पारनेर ०४, पाथर्डी ३६, राहाता ०६, राहुरी ०५, संगमनेर २४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २२०, अकोले २८, जामखेड ०६, कर्जत १८, कोपरगाव २८, नगर ग्रामीण ४७, नेवासा ४८, पारनेर १६, पाथर्डी ३५, राहाता ७४, राहुरी १४, संगमनेर ६६, शेवगाव १०, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ५५, कॅन्टोन्मेंट ११ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:८५०५३
- उपचार सुरू असलेले रूग्ण:५८९४
- मृत्यू:११९५
- एकूण रूग्ण संख्या:९२१४२
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|