आज ६४३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८२९ बाधितांची रुग्ण संख्येत भर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ७३९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४९८५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०४ आणि अँटीजेन चाचणीत २२० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९०, अकोले ०१, जामखेड ०१, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण ०५, नेवासा १३, पारनेर १०, पाथर्डी ०१, राहुरी ०२, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ०४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२४, अकोले ०४, जामखेड ०२, कर्जत ०२, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ४१, नेवासा १२, पारनेर २१, पाथर्डी ०४, राहाता ७०, राहुरी १२, संगमनेर ३३, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ४०, कॅन्टोन्मेंट ०८ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २२० जण बाधित आढळुन आले. मनपा २५, अकोले २२, जामखेड ०१, कर्जत ३०, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण २८, नेवासा २७, पारनेर १७, पाथर्डी २४, राहाता १२, राहुरी १६, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १९५, अकोले ११, जामखेड १७, कर्जत ०६, कोपर गाव ४८, नगर ग्रामीण ४१, नेवासा २६, पारनेर ०८, पाथर्डी २३, राहाता ६४, राहुरी ३८, संगमनेर ४३, शेवगाव ३१, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ४७, कॅन्टोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ३१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:८२७३९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:४९८५
  • मृत्यू:११८९
  • एकूण रूग्ण संख्या:८८९१३
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe