अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला एक लाखाचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ७०१ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९०९८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८२३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९०२ आणि अँटीजेन चाचणीत २७१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१२, अकोले ०३, जामखेड ७५, कर्जत १६, कोपरगाव ३५, नगर ग्रामीण २६, नेवासा १०, पारनेर ४९, पाथर्डी ८५, राहता ५३, राहुरी ०६, संगमनेर ९७, शेवगाव ३९, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ५४, कॅंटोन्मेंट बोर्ड ३०, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२८, अकोले ०४, जामखेड १२, कर्जत ०८, कोपरगाव १४८, नगर ग्रामीण ५८, नेवासा १९, पारनेर ०५, पाथर्डी २८, राहाता १३४, राहुरी ३८, संगमनेर ५७, शेवगाव १४, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर १११, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, इतर जिल्हा १६ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७१ जण बाधित आढळुन आले. मनपा ३६, अकोले २१, जामखेड ०७, कर्जत ०१, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ०९, नेवासा २८, पारनेर ११, पाथर्डी २८, राहाता ०८, राहुरी ३५, शेवगाव १६, श्रीगोंदा २४ आणि श्रीरामपूर २८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३५४, अकोले ३९, जामखेड ४७, कर्जत ५९, कोपरगाव ८९, नगर ग्रामीण ३७, नेवासा ५२, पारनेर ३५, पाथर्डी ३९, राहाता १२६, राहुरी ८२, संगमनेर ८४, शेवगाव २२, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ७९, कॅन्टोन्मेंट २९ आणि इतर जिल्हा २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:८९७०१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:९०९८
  • मृत्यू:१२३८
  • एकूण रूग्ण संख्या:१,००,०३७
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe