अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने पोटात वार करून खून करण्यात आला असल्याची धक्कादायक बातमी नगर तालुक्यातून समोर आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :- शरद दत्तात्रय वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून
बाळासाहेब नामदेव वाघ (वय 50 रा. पिंपळगाव उज्जैनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
चौघे तरूण जखमी :- नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी शिवारात ससेवाडी जाणारे रोडवर तलावाच्या जवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये आणखी चौघे तरूण जखमी झाले आहेत.
यांच्यावर गुन्हा दाखल :- मल्हारी उर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषीकेश रघुनाथ आल्हाट, मारीया बन्सी आल्हाट ( सर्व रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम
अहमदनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला ! ‘या’ दिवशी देणार भेट….
वाचा सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻https://t.co/mF3qGUZF7X
— Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) May 25, 2021
अहमदनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला ! 'या' दिवशी देणार भेट….
वाचा सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻https://t.co/mF3qGUZF7X
— Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) May 25, 2021