अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्री महादेव मंदिरामध्ये असलेल्या सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची कोणी अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेनंतर टाकळीभान मधील तरुणांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळवे यांना सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या व मंदिरातील वस्तूंची नासधूस करणाऱ्या
आरोपीचा लवकरात लवकर शोध लावावा व त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करावी यासाठी तक्रार अर्ज दिला होता.
याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांनी सांगितले कि, या घटनेबाबत तक्रार अर्ज प्राप्त झालेला असून पोलीस देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
त्याचा शोध लागल्यानंतर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक साळवे यांनी यावेळी दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम