अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाच्या धुमाकूळामुळे अहोरात्र प्रवाशांच्या सेवेत हजर असलेली लाल परी मागील तब्बल ६४ दिवसांपासून थांबली होती.
परंतु आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने निर्बंध शिथील झाले व परत एकदा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ जिल्ह्यांतर्गत लाल परीची चाके धावणार आहेत.
सुरूवातीला ५० टक्के फेऱ्या सुरू होणार असून नंतर शंभर टक्के क्षमतेने लालपरी धावणार आहे. प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीला म्हणजेच एसटीच्या कार्यकाळास एक जून रोजी ७३ वर्ष पूर्ण झाली.
मागील सात दशकांपासून विश्वासाची सेवा अहोरात्र एसटी देत आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे अहोरात्र धावणारी एसटी डेपोत शांतपणे उभी होती.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्याने लाल परीची सेवा रुळावर येत असतानाच परत कोरोनाची दुसरी लाट आली अन् त्यामुळे दि.४ एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता प्रवासाचे निर्बंध आल्याने जवळपास ६२ दिवस सामान्य प्रवाशांना एसटी प्रवासास परवानगी नव्हती त्यामुळे ती बंद केली.
यामुळे मागील ६२ दिवसात नगर विभागाचे सुमारे २५ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. मात्र आता जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी जारी केलेल्या आदेशानुसार एसटीचा ब्रेक निघाला आहे. त्यामुळे परत एकदा लाल परी सजून प्रवासाला निघाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम