अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?’ अशा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केला आहे.
मंत्री आव्हाड यांनी हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या. आव्हाड यांनी शुभेच्छा देताना म्हटले होते, ‘प्रिय अण्णा, प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव,
ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव यांच्याबद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.
आव्हाड यांनी केलेले हे ट्वीट समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. आव्हाड यांच्या खोचक शुभेच्छांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आक्रमक उत्तर दिले. हजारे यांनी म्हटले आहे की, मी एक सामान्य माणूस आहे. जनतेची सेवा करतो.
पण तुम्ही तर मंत्री आहात, या प्रश्नांसाठी मग तुम्ही काय केले? प्रत्येक प्रश्नासाठी हजारे यांनीच आंदोलन करावे का? तुम्हीही जनतेचे सेवक आहात, मग तुम्ही जनतेसाठी काम का करीत नाही?’ असा सवाल उपस्थित करून हजारे यांनी आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम